आज सावित्रीबाई फुले यांची जयंती, तस लिहिण्यासारखं खूप काही आहे पण लिहायची ईच्छा होत नाही. पण दुपारी एका विद्यार्थ्याने मॅसेज केला आणि सांगितलं की,"अस काहीतरी पोस्ट,व्हिडिओ सेंड करा जे काळजाला भिडाव" मी काही वेळ स्तब्ध झालो. सर्व बाजूला ठेऊन काल दुपारी लिहायला घेतलं पण ते रात्रीपर्यंत पूर्ण करू शकलो नाही. आज ते पूर्ण झालं. ते अपल्यासर्वांपुढं ठेवत आहे. वाचावे व काही लक्षात आले तर कळवावे.
#सडेतोड
#नवनिर्माण
एखादी समस्या जाणून घेऊन त्या समस्येवर उपाय काढणारे त्या काळातील समाजसुधारक म्हणून फुले दाम्पत्यांचं नाव घेतलं जातं. म्हणजेच आम्हाला शिकण्याचा अधिकार नसताना आमच्यासाठी शिक्षण उपलब्ध करून देण्याच काम फुले दाम्पत्याने केले. हे काम करत असताना त्यात महत्वाचा वाटा जो होता तो म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा.
हे ऐकून वाचून आम्हाला गुळ-गुळीत झालेले शब्द आहेत. त्यातून जी प्रेरणा भेटायला पाहिजे ती आम्हाला भेटत नाही. म्हणजे आम्हाला या शब्दातील भाव काढून टाकून फक्त अक्षर आहेत तेवढेच वाचतोय आणि त्यातून आम्हाला काहीही प्रेरणा मिळत नाही अस झालंय.
कोणत्याही महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी असेल तर, आलेला वक्ता काय बोलेल याचा अंदाज श्रोता वर्ग लावत आहे. म्हणजे आपण काय सांगणार हे आता ऐकणाऱ्याला कळत आहे. मग हा घोटीव इतिहास किती वर्षे सांगायचा. सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगावर शेण,दगड, गोटे यांचा मारा सहन केला आणि आमच्यासाठी शिकवण्याचा काम चालूच ठेवले. या शब्दातून आम्हाला फक्त काहीवेळा ऊर्जा मिळते, पण त्यांच्या या कार्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे परिस्थितीनुसार आपल्याला कामे करावी लागतील. हा गुण आम्ही कधी डोक्यात घेणार आहोत का ?
जर आम्हाला खरचं कामे करायची असतील तर, परिस्थितीला बदलवायचे असेल तर, इतिहासावर नाही तर वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागते. आम्ही इतिहास सांगत असताना फक्त इतिहासावरच लक्ष केंद्रित करतोय भविष्याबद्दल आमच्याकडे काहीही प्लॅन नाही असं दिसतंय. अशाने आमची अधोगती, व अस्तित्वात असलेला द्वेषभाव व विषमता नष्ट होणारच नाही. आम्हाला जर खरंच या देशात समतामुलक व्यवस्था निर्माण करायची असेल तर आम्हाला इतिहास जरूर सांगावा लागेल. पण तो ईतिहास सांगत असताना ज्या शिक्षणाची गरज फुले कुटुंबियांना जाणवली, ज्यामुळं शिक्षण दानाच काम त्यांनी सुरु केलं त्याचा उद्देश पूर्ण झाला का ? नसेल झाला तर मग आम्ही कुठे आणि का कमी पडतोय ? याच चिंतन आम्ही का करत नाही ?
याचा जेव्हा विचार करतो तेव्हा अशी शंका येते की आम्हाला राजकीय पोळ्या भाजून पोट भरायची आहेत. त्यामुळं आम्ही अस काहीही करत नाही. कदाचित ही शंका प्रत्येक वेळी लागू होणार नाही. पण ही शंका जर खरी नसेल तर त्याच स्पष्टीकरण द्या... जर असेल खरी तर ही शंका नाहीशी करण्यासाठी काम करा.
आज प्रत्येक स्त्री शिक्षण घ्यावी म्हणून आपण धडपड करतोय पण ही शिकलेली स्त्री समतेच जीवन जगत आहे का ? तिला समाजात सन्मानाची वागणूक भेटते का ? समाजात स्त्री शिकली ते फक्त आणि फक्त आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी म्हणून. पण कमावणाऱ्या स्त्रीने कधी फुले दाम्पत्याच्या त्यागाचा किंवा ध्येय उद्दिष्टांचा विचार केलाय का ? जर ही स्त्री अशा कोणत्याही गोष्टीचा विचार करत नसेल तर तुम्हाला आज जयंती साजरी करण्याचा काय अधिकार आहे ?
तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असेल तर डॉक्टर तुम्हाला तो पदार्थ तुम्ही खाऊ नका अस सांगतात आणि आपण ऐकतो सुद्धा. काही काळासाठी होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून आपण जसे पदार्थ टाळतो, तसेच पण आयुष्याभर आम्हाला काही चालीरितींमुळे त्रास होतो पण तरीही आम्ही त्या चालीरीती सतत चालूच ठवतो. या विचारांमुळे होणाऱ्या ऍलर्जी साठी तुम्ही कोणत्या गोष्टी करणं थांबवलं ?
म्हणजे आम्हाला शिक्षण भेटलं, उच्च शिक्षणाच्या जोरावर आम्हाला नोकरी भेटली, पण तरीही नोकरी करत असताना आमच्यात सन्मान आला नाही, आमच्या सन्मानाचे काय ? मग आम्ही शिकलेल्या शिक्षणाचा फायदा काय ? आपण शिकल्यानंतर आपल्यात वैचारिक परिवर्तन व्हायला पाहिजे. हे होणं गरजेचं आहे.
आजची स्थिती बघता आज आम्हाला कोणत्याही संजसुधारकांची गरज नाही. कारण ज्ञानाचे दरवाजे आमच्यासाठी 24 तास खुले आहेत. आम्हाला हवे तेव्हा हवे ते ज्ञान मिळत आहे. म्हणजे आम्हाला आता कोणतेही कार्य करण्यासाठी ज्ञान उपलब्ध होत आहे. फक्त गरज आहे ती एका चिंगारीची आणि ती चिंगारी निर्माण करणारा शब्द आहे "का ?" हा एक शब्द जर वापरत गेलात तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यासोबत घडत असलेल्या अन्यायाला वाचा फोडता येते. मग तो स्त्रीवरील किंवा पुरुषावरील असो. त्यामुळं आज आम्हाला आमचा विकास करण्यासाठी कोणत्याही त्रयस्थाची मदत लागणार नाही यातून महापुरुषांना अपेक्षित समाज घटक होऊ व आदर्श समाज घडवू. समतेच आयुष्य प्रत्येकजण जगेल.
✍️✍️@ जी.संदीप (नांदेड)
9552803980