#Sunday_specil
एका दिवसाच्या स्वातंत्र्य दिनानातून जर बाहेर आले असाल तर या गोष्टीकडे जरा लक्ष द्या देशावर जर खरच प्रेम असेल तर स्वातंत्र्यदिनीच काय घडलं आहे याकडे पण मेंदू उघडा ठेवून पहा जरा.
पहिले चित्र स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वीएकमहिन्यापासून आंदोलन सुरू असते त्या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नाही म्हणून आंदोलक स्वातंत्र्य दिनी आपले म्हणणे राजकीय नेत्याकडे घेऊन जाऊ पाहतो पण त्या आंदोलकाला स्वातंत्र्य दिनी(स्वदेशीयांच्या सत्तेत) सुद्धा अशी लाथ कमरेत बसते. प्रश्न घेऊन समोर येणे हा गुन्हा आहे ? ब्रिटिशांची सत्ता असताना असा त्रास स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्रयोध्दांना दिला जायचा पण परवाच हा प्रसंग कोणत्या गुर्मीत भारतीय जनतेला भोगावा लागला हे कळायला मार्ग नाही. मग या जनतेने आता कोणते चलेजाव चे आंदोलन करायचे आणि कोणाच्या विरोधात ? आंदोलक चुकला असेल त्याने काही चूक केली असेलच पण म्हणून या स्वातंत्र्यात त्याच्या सन्मालाला अशी लाथ घालाल काय ? ते पण त्याच्या चिमुरड्या बालकासमोर ? अरे नालायकांनो किती वर्ष स्वातंत्र्याचा उपभोग न घेता फक्त स्वातंत्र्याची गोडवे गात बसायची ? गरिबीतून वर आलेला प्रशासकीय अधिकारी सुद्धा असा गुर्मीत वागायला लागला तर लोकशाही कधीच या देशात रुजणार नाही. फक्त कागदोपत्री काही प्रमाणात चालू राहील.
दुसरे चित्र शेतकरी आंदोलनाची दखल घेतली जात नाही हे लक्षात येताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आंदोलक नदीत उडी मारून आपला जीव गमावतो. स्वातंत्र्यात प्रशासनातील कर्मचाऱ्यांसमोर जर असे करण्याची वेळ येत असेल तर या स्वातंत्र्याचा अंमल किती योग्य मार्गाने सुरू आहे यावर विचार करण्याएवढी लायकी असेलच तुमची.
तिसरे चित्र स्वातंत्र्य दिनादिवशीच राष्ट्रध्वज जमिनीवर रेखाटून त्यावर विशिष्ट ध्वज उभा केला जातो.(हे चित्र कुठले आहे याबद्दल माहिती उपलब्ध नाही.कोणाकडे सविस्तर माहिती असेल तर कळवावे). स्वातंत्र्य दिनी अशा घटना उघडकीस येतात आणि त्यावर काहीच कार्यवाही होत नसेल तर तुमच्यात देशभक्ती किती आहे हे आपण दाखवून देताय. असा राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करून ईतर कोणत्याही रंगाचा ध्वज वर असता तर हेच देशभक्तीच्या नावाने पिपाणी वाजवणारे आज आकाश पाताळ एक केले असते. पण आज जेव्हा देशभक्तीचे ज्ञान पाजणारेच जेव्हा अक्कल गहाण ठेवतात आणि आपल्या रक्तात किती देशभक्ती आहे हे सिद्ध करतात तेव्हा मात्र त्यांच्या देशभक्तीची कीव येते.
ऐन स्वातंत्र्यदिनी या गोष्टी घडत असताना आम्ही कोणता स्वातंत्र्य दिन साजरा केला मग ? नैतिकस्वातंत्र्य जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वतंत्र हे काडीमोलच आहे. स्वातंत्र्याचा प्रभावीपणे अंमल व्हावा म्हणून लोकशाही स्वीकारली पण या लोकशाहीत मतदान सुद्धा धमक्या देऊन घेतले जाते. वोटर लिस्ट मध्ये मतदार दाखवून मतदार बूथ वरील कर्मचाऱ्यांना धमकी देऊन त्यांना बाजूला सारून हवं त्या उमेदवाराला मतदान करून घेतल्या जाते. मतदानाबद्दलच हे सत्य कोणीही नाकारणार नाहीच. तरीसुद्धा प्रत्येक जण शांत राहून पाहत बसतो लोकशाहीत कोणीही निवडून आले तरी आमची चूल चालवण्यासाठी आम्हालाच कष्ट करावे लागतात असे म्हणत नशिबाला दोष देऊन बाजूला होतो.
नशीब आणि आपली चूल चालवायला आपल्यालाच कष्ट करावे लागतात हे जेव्हा या सामन्यांच्या डोक्यातून जाईल तेव्हाच लोकशाही रुजण्यास खरी सुरुवात होईल. तुमची चूल चालवायची असेल तर त्यासाठी तुमच्या हाताला रोजगार हवा, तो रोजगार कोणता करावा यासाठीच दर्जेदार शिक्षण हवं शिक्षण. या दोन्ही गोष्टी करण्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची आहे. यात तुमच्या नशिबाचा काहीही हात नाही. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत या स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. हे स्वातंत्र्य असून नसल्यासारखेच आहे असे म्हणावे लागेल.
© जी.संदीप.(गोणार,नांदेड.)
9552803980



