Sunday, March 28, 2021

.....म्हणून लॉकडाऊन ची भीती !

लॉकडाऊन मूळ भरलीय धडकी

हातावर पोट आहे मणून नाय ओ सायब

पोराचं नेमकं शिकण्याच वय

त्यात एक वर्ष वाया गेल म्हणून,

छातीत धड-धडायला लागलंय ओ सायब

म्हणून प्रश्न दोन वेळच्या जेवणाचा नाय ओ सायब


एक वर्षाचा विचार करून

तुम्ही त्यावर उपाय काढला

मुलाला नापास न करता

तुम्हीं पुढच्या यत्तेत धाडलं त्याला

पण त्या एक वर्षात हिरावून घेतलेल्या

मूलभूत हक्काचं काय ओ सायब,

त्या एक वर्षात कोवळ्या मनावर

भविष्याचं बीज पेरलं जाणार होत सायब

त्या कोवळ्या मनावर ना रुजलेल्या

बियाचा विचार येतो हो सायब

म्हणून लॉकडाऊन ची धडकी भरते ओ सायब.


चांगलं वर्गात पहिला येणार आमचं प्वार

आज उनाडक्या करत गावभर हिंडतंय ओ सायब

ए,बी,सी,डी वन टू ते जे काय म्हणता ते 

बिना शिकवणी घडा-घडा

बोलून दावणार माझं प्वार

आता तसलं काही विचारताच गप्प-गुमान

मान खाली घालतंय ओ सायब

म्हणून प्रश्न दोन वेळच्या जेवणाचा नाय ओ सायब.


मास्तराला प्यार होत माझं लेकरू

नेहमी कौतुक असायच

सगळ्यांच्या तोंडी गुणांच लेकरू,

आता त्यातले सगळे गुण बदलून गेलेत ओ सायब

काल शालिनतेने वागणार माझं प्वार

आज शिव्यांची लाखोली वाहतंय ओ सायब

हे सर्व पाहून त्याच्या भविष्याची चिंता सतावतेय ओ सायब

म्हणून तुमच्या लॉकडाऊन ची भीती वाटतेय

प्रश्न दोन वेळच्या जेवणाचा नाय ओ सायब


वयात आलेलं प्वार हताश निराश होऊन 

डोळ्यासमोर मान खाली घालुन बसतंय ओ सायब

दोन वर्षे झालं तुमची नोकरभरती नाही,

घोटाळे बंद व्हायचं नाव घेत नाही,

आम्ही तरी त्याला किती आणि

कसा धीर द्यायचं सायब ?

नोकरीविना, बेरोजगरीमुळं पोराचं लग्न जुळत नाही,

लेकीला नौकरी लागलं म्हणून

लग्नापासून दूर ठेवले तिला.

शिक्षणाच्या प्रवाहात आणून तिला

आम्ही काय खूप मोठा गुन्हा केला ?

आता नोकरी नाही, नोकरिवाले मूल भेटत नाही

यात आमचं कुठं काय चुकलं ?

हे जाणून घेऊन तुम्हीच सांगा सायब

आम्ही सामान्यांना कसे दिस काढायचं सायाब ?

हि परिस्थिती पाहता भीती वाटते आम्हा त्या तुमच्या लॉकडाऊन ची

भ्रांत नाही ओ सायब आम्हा

आमच्या दोन वेळच्या जेवणाची.


हि इथली जनता म्हणजेच देश ना ओ सायब

मग जनतेचीच अधोगती असेल,

जनतेचाच विकास नसेल,

जनताच निराश आणि हताश असेल,

जनताच वाऱ्यावर असेल ,

तर देशाचा विकास कसा होईल सायब

देश आणि देशातील प्रत्येक घटकांची

 काळजी लागून राह्यली

म्हणून तुमच्या लॉकडाऊन ची भीती सायब

आम्हा दोन वेळच्या जेवणाची मुळीच भ्रांत नाही वो सायब।



©जी.संदीप (गोणार,नांदेड)

📱 9552803980

Sunday, March 7, 2021

ती खुश आहे

जन्मत असता तिच्या पोटी सांगितलं जातं तिला,

पृथ्वीवर येऊ देऊ नको नष्ट कर तिला.

स्वतःसारखीलाच नाकारते स्वतः ती,

तरीही यात खुश्श आहे ती.


तिला घरात राबायला शिकवते तीच

आणि त्याला बाहेर पाठवते तीच,

या भेदभावाची सुरुवात करणारी असते तीच,

तरीही यात खूप खुश्श आहे ती.


धोका आहे त्याच्यामुळे हे जाणते ती

पण बंधन तिच्यावर लादते तीच,

सात च्या आत घरात यायला सांगते तीच

पण तरीही यात सुद्धा जाम खुश्श आहे ती.


घरकाम करते,

घरासाठी कमी-जास्त सुद्धा घते तीच,

सोबतच नोकरी करते,मावते सुद्धा ती,

तरी आलेल्या पगाराचा हिशोब देते ती,

तरीही यात सुद्धा

बक्कळ खुश्श आहे ती.


मीडियाच्या जाहिरातीत,

स्त्रीवादी पात्राच्या सुद्धा,

बंधनात अडकवते स्वतःला तीच,

तरीही त्यात सुद्धा

चिक्कार खुश्श आहे ती...


निवडणुकीत 50% आरक्षणावर निवडून येते ती,

आणि कारभार मात्र पाहतो तिचा मुलगा किंवा  पतीच, 

तरीही यात सुद्धा

लई  खुश्श  आहे ती.


मुलगा-मुलगी भेदाचे संस्कार करते तीच,

असताना स्वतः सुद्धा क स्त्री तीच,

पुरुषापेक्षा दुय्यम दर्जा स्वीकारते तीच,

तरीही यात सुद्धा मोक्कार खुश्श असते ती.


पण पहा ना,या कवितेत स्त्री

बेफ्फाम खुश्श वाटते ती,

पण वाचल्यानंतर संदीपची कविता,

नकळत दुःखी झाली ती, दुःखी झाली ती....



©️जी.संदीप(नांदेड)

   9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...