Sunday, September 3, 2023

ABC id

 काय आहे ABC I'd आणि ती कशी काढायची ?



       पुढील वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये गुण आणि ग्रेड पद्धत बंद होऊन क्रेडिट पद्धत लागू करण्यात येणार आहे. तुम्ही कोणत्याही फील्ड चे जर शिक्षण घेत असाल तर त्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे. ABC I'd(Academic Credit Bank) म्हणजे एकप्रकारे बँकेतील खात्याप्रमाने तुमचे शैक्षणिक क्षेत्रातील खाते होय. बँकेत जसे तुम्ही पैसे जमा केल्यानंतर ते तुमच्या खात्यात जमा राहतात. तसचं तुम्ही जस शिक्षण घेत रहाल त्या पद्धतीने तुमच्या शैक्षणिक खात्यात तुमचं क्रेडिट जमा होत राहणार आहे.      

         त्यासाठी ABC I'd ही अत्यंत आवश्यक आहे. याची दखल घेऊन विद्यार्थ्यांनी आपली ABC I'd तयार करून घ्यावी.


ABC I'd काढण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर पुढील प्रक्रिया करावी.


https://www.abc.gov.in/

त्यानंतर विविध वेबसाईट च एक पेज तुमच्या समोर ओपन होईल. त्यातील पहिली वेबसाईट ओपन करावे.




त्यानंतर my account हा पर्याय उजव्या बाजूला कोपऱ्यात दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर students आणि university यापैकी students या पर्यायावर क्लिक करावे.


त्यानंतर त्यात mobile no टाकावा त्यावर एक OTP येईल तो OTP टाकून verify वर क्लिक करावे.



पुढील पेज ओपन होईल.

त्खलील (आवश्यक ती सर्व माहिती भरावी)

 पूर्ण नाव ------

जन्म दिनांक -----

gender ------

एक युजर नेम टाईप करावा (हा नवीन युजर नेम तयार करायचा असतो.)------

त्यानंतर pin जो ठेवायचा असेल तो pin टाईप करावा ---------- 

तोच  पिन पुन्हा टाकावा --------

dialogue box la click (त्याखाली असलेला चौकोन) करून

verify वर क्लिक करावे. 


त्यानंतर आधार kyc साठी च पेज ओपन होईल

त्यात आधार नंबर टाकावा 

त्यानंतर येणारा OTP टाकून सबमिट करावा.


त्यानंतर ईमेल साठी पेज ओपन होईल त्यात ईमेल टाईप  करावा आणि verify वर क्लिक करावे.



त्यानंतर मेल ला OTP येईल तो OTP टाकून सबमिट करावे.

त्यानंतर जे पेज ओपन होईल त्यात

विद्यापीठाचे नाव मद्ये (Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded) निवडावे

Admission year या वर्षी ज्यांचे झाले आहे त्यांनी 2023 निवडणे (अन्य विद्यार्थ्यांनी आप आपला प्रथम वर्षाचे प्रवेश वर्ष टाकावे.)

Identity type :- (योग्य ते निवडून sabmit करावे.

त्यानंतर abc I'd तयार झाल्याची स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल. 


त्याची प्रिंट काढून महाविद्यालयात सबमिट करावे.


No comments:

Post a Comment

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...