Thursday, August 3, 2023

ती होईल सेट्टल तुला काय भेटल ?




आयुष्याच्या एका वळणावर,

एकटेपणा घालवायला तुझ्या आयुष्यात ती येईल

आनंदाने जायला लागतील दिवस तुझे 

वेळ आणि काळ सुद्धा लक्षात नाही राहील.


दिवसा गणीक दिवस जात राहतील,

महिने आणि कदाचित वर्ष सुद्धा निघून जातील,

आयुष्याची स्वप्ने रंगवत

दिवस रात्र निघून जात राहतील


दोघांच्याही मनामध्ये स्वप्नांची रीघ लागेल

परिस्थिती नुसार आणाभाका घेतल्या जातील.

तिच्यासाठी हवं तिथे हवा तसा बदल तू करत जाशील,

काहीच नसेल बाकी बदलण्यासारखे तर विनाकारण वाद घातला जाईल.


तू आता पहिल्यासारखा राहिला नाहीस रे, अस म्हणून 

वारंवार तू बदलल्याची जाणीव करून दिली जाईल.

तिच्यासाठीच तू बदलत गेलास पावलोपावली

पण तरीही त्या बदलण्याची तिला कदर नाही राहील.


तुझ्याकडून तिला हवी तशी साथ नाही मिळाली,

तर तुला दोष देणे तिचे सुरू होईल.

तुझ्यापासून नेहमीचे दूर होण्यासाठी

 विविध मार्गाचा विचार करणे डोक्यात सुरू राहील


दूर होण्यासाठीचे मार्ग शोधत असताना 

विविध मार्गांमध्ये एखादा मार्ग  अंमलात आणल्या जाईल

त्याची अंमलबजावणी करण्याआधी तशीच स्वप्ने पुन्हा रंगवणारा

अजून दुसरा कोणीतरी शोधला जाईल.


त्याच्यासोबत पुन्हा तीच स्वप्न त्याच गोष्टी

पुन्हा नव्याने रंगवल्या जातील.

तो तिच्यात गुंतत जाईल, ती त्याच्यात गुंतत जाईल

हे नवीन नाते सुद्धा  किती दिवस टीकेल हे फक्त तीच्याच मनात राहील. 


टिकले ते नाते तर कुटुंब किंवा अन्य कारणे देऊन

दूर होण्याची वेळ येऊन जाईल.

या सगळ्या गोष्टीत तिला तिचे कुटुंबीय

इज्जतीचा प्रश्नापायी चांगला मुलगा शोधून

तिच्या भविष्याची करतील सोय 


त्या परिस्थितीत ती स्वतः ला सामावून घेऊन

आनंदाने मार्गक्रमण करत जाईल.

तू तिच्या जुन्या आठवणीत रमून व्यसनाधीन होशील,

त्या व्यसनाधिनतेत स्वतःच भविष्य उध्वस्त करून टाकशील.


घरच्यांनी जो जोडीदार निवडला आहे

त्याच्यासोबत ती राहील आनंदाने

तुझ्या आधी आणि नंतर सोडले कैक तिने,

मग तिला फरक पडणार नाही कोणाच्याही विरहाने.


त्यामुळं मित्रा प्रेमाच्या फंदात पडण्याचा विचार

डोक्यात येण्याआधी स्वतःला भविष्यासाठी पात्र बनव.

येण्याचा प्रयत्न जरी केली कोणी आयुष्यात,

तिच्यासोबत भविष्याचा लेखी करार करण्याची हिम्मत ठेव.


भावनिक होऊन तू तिच्या प्रेमात वाहवत जाशील तर

तुला तुझ भविष्य घडवण्या वेळ मिळेल का ?

तीच भविष्य कस घडवायचं हे ठरवायला तिचा बाप आहे

पण तुझ्या भविष्याची डोर तुझ्याशिवाय दुसर कोणी नाही हे तुला कळेल का ?

- संदीप गोणारकर 

9552803980

2 comments:

  1. Very nice poem sir🔥

    ReplyDelete
  2. अगदी सत्य लेखन आहे

    ReplyDelete

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...