ती:- चल रे आपण देवाला जाऊयात
मी :- का बर तिकडे काय आहे ?
ती :- आहे काही तरी नाही सांगणारं तुला.
मी :- पण तरी काय गरज आहे तिकडे जायचो ?
ती :- देव आहे तो, त्याच्याकडे आपल्याला जावंच लागते ना ?
मी :- का ? नाही गेलं तर जमणार नाही का ?
ती :- नाही जमत, ते आहेत म्हणून तर आपण आहोत.
मी :- ते कस ? आपण तर आपल्या आई वडिलांमुळे आहोत ना ?
ती :- आपल्याला फक्त जन्म त्यांनी दिला पण देव नसते तर आपण जन्म घेऊ शकलो नसतो.
मी :- जन्म घेण्यासाठी देवाची गरज असेल तर मग आई वडिलांचं काय काम आहे. देवाने डायरेक्ट आपल्याला जन्म द्यायला पाहिजे ना.
ती :- बाकी काही बोलू नकोस, तुझ्या तोंडी लागण माझ्याने शक्य नाही. तू येणार आहेस का नाही तेवढं सांग ?
मी :- मी एकदा बोललेल तुला कळत नाही का ? तू हजार वेळा जरी विचारलीस तरी मी माझं मत बदलणार नाही.
ती :- येणार आहेस का नाही ?
मी :- नाही.
ती :- यामुळच तू सिंगल आहेस रे. तू मुलींच्या मनाची कदरच करत नाहीस.
मी :- यात मी काय चुकीचं बोललो बर, मला पटत नाही मी येत नाही.
ती :- तुला पटत नसल तरी काही वेळा मुलींच्या विचारांची कदर कर रे.
मी :- ज्या मुलींना माझे विचार पटत नाहीत त्या मुलींनी माझ्याशी संपर्क करूच नये ना. मी काय औतन देत नाही, किंवा मी स्वतः कधी मॅसेज करून म्हणत नाही मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून.
ती :-
बाय ! बोलू नकोस मला. देवाला येणार असशील तरच कर मॅसेज
मी :- काल्पनिक गोष्टी सोडून वास्तवाकडे जायचं असेल तरच बोल मला. नाहीतर कायमचा
बाय ! तर बाय !
ती :- सुधर रे जरा, किती म्हणून attitude रे तुझ्यात ?
मी :- काही चुकीचं बोललो का ? काही गैर बोललो का ? काही खोटं बोललो का ? माझी चूक तरी काय आहे ?
ती :- तू माझी कधीच स्तुती करत नाहीस, तू माझ्या आवडीच्या काही गोष्टी कधी कधी मुद्दाम करत नाहीस, तू माझ्या विचारांना स्वीकारत नाहीस. तू तुला हवं तेच करतोस.
मी :- मला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. बर झाल तू स्वतः हुन बाय म्हटलीस, मी जर तुझ्यापासून दूर झालो असतो तर माझ्या मनाला खूप पश्र्चाताप झाला असता. मी स्वतः ला माफ करू शकलो नसतो. तू बोललेल्या कोणत्याच आरोपावर मला काहीही बोलायचं नाही.
ती :- म्हणजे मी केलेले आरोप तुला मान्य आहेत ?
मी :- त्या प्रश्नाचं पण उत्तर देणं पण गरजेचं आहे असं वाटतं नाही. वेळ आल्यानंतर तुला माझ्याबद्दल कळेल. तोंडावर तुझी स्तुती करणारे योग्य का मनातून काळजी करत तुला जपणारा योग्य ?
*Thnx sorry ani bye*
.jpeg)
No comments:
Post a Comment