Monday, February 21, 2022

गुन्हा आणि गुन्हेगारीची शिक्षा.....फाशीच का ?

 हिंगणघाट येथील पीडितेचा मृत्यू झाला आणि पुन्हा काही मुद्दे चर्चेला आले त्यात प्रेम महिलेवरील बलात्कार महिला असुरक्षित झाले आहे आरोपीला शिक्षा या सर्व बाबींवर विविध स्तरांतून चर्चा होत आहे त्यासंदर्भात घेतलेला आढावा.... 

      महिलेवर अन्याय झाला, बलात्कार करून खून केला की आरोपीला फासावर लटकवा ही मानसिकता जोर धरत आहे पण, हा न्याय आहे का ?..... आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल आणि अत्याचार पीडित व्यक्तीला न्याय कसा मिळेल ? हा प्रश्न आपण भावनिक ओघात विसरून चाललो असे वाटत नाही का ? मेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला न्याय कसा मिळू शकेल ? मेल्यानंतर त्या व्यक्तीचा न्यायाशी काय संबंध ? या प्रश्नाची उत्तरे आम्हाला आधी जाणून घ्यावी लागतील त्या नंतरच योग्य शिक्षेचा विचार होईल. ती जाणून घेण्यापूर्वी आपण काही संकल्पना समजून घेऊया त्यात 

01) आत्मा,

2 ) मेल्यानंतर आत्म्यास शांती प्राप्त होणे.

03) देहदंड दिला म्हणजे न्याय मिळणे....

         निसर्गाचा ऊर्जा निर्मिती संदर्भात एक नियम आहे, ज्याला ऊर्जा अक्षय्यतेचा नियम म्हणतात. जो सांगतो की - "ऊर्जा निर्माण करता येत नाही, व नष्टही करता येत नाही, तर ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होत असते." म्हणजेच निसर्गतः नवीन कोणतीही गोष्ट निर्माण होत नाही तर त्याआधी कोणत्यातरी रुपात निसर्गात दडलेले असते. त्यापासून नवीन तयार होत असतात. तसेच प्राण्याच्या बाबतीत सुद्धा उघडते प्राणी हा निसर्गातील विविध घटकांपासून बनतो, ज्यात माती, पाणी, अग्नी हवा आणि आकाश ज्याला पंच महाभूते अस म्हटलं जातं. या घटकातील कणांपासून प्रत्येक मानव तयार होतो. त्यानंतर त्याची वाढ होत राहते. (त्याच्या तयार होण्यास दुवा म्हणून स्त्री आणि पुरुष काम करतात ही बाब वेगळी.)

     या वाढीमध्ये वयानुसार त्यांच्या भावनिक विकास होत राहतो. मानवाच्या जन्मतः भावना विकसित झालेल्या नसतात, वयपरत्वे व  व ज्ञानानुसार त्याच्या भावना वाढत जातात. त्याच पद्धतीने आयुष्याच्या शेवटाकडे असताना त्याच्या भावना कमी होत जातात.  तो भावनाहीन होतो व शेवटी त्याचा अंत होतो. म्हणजेच मानवाच्या जन्मापासून अंतापर्यंत त्याच्या भावनांचा प्रवास सुरू असतो. तो मृत झाल्यानंतर त्याच्या भावना नष्ट होतात. त्याच्या नंतर त्याच्या बाबतीत न्याय अन्यायाचा मुद्दा शिल्लकच राहत नाही. मग पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याचा प्रश्नच कुठे येतो.  यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे ज्या बाबींपासून आपले शरीर तयार झाले (वरील पाच घटकांपासून) ते घटक त्यात मिसळून जातात व मानवी शरीर नष्ट होते.

        मानव नष्ट होतो म्हणजे त्याचा अस्तित्व नाहीसे होते. मानव मरण्यापूर्वी त्याच्या भावना कमी व्हायला लागलेली असतात. त्यामुळे त्याच्या मृत्यूपश्चात कोणता अवयव निसर्गात भरकटतोय असे म्हणण्यास वाव प्राप्त होत नाही. त्यामुळे आत्मा हा विषय आपल्या मनातून अशा गुन्हेगारी बाबींसाठी दूर ठेवूया. वैचारिक पातळीवर जेव्हा या बाबींचा विचार करण्यात येतो तेव्हा असे कुठेही जाणवत नाही की मृत्युपश्चात काही घडत असेल. निर्भयाच्या प्रकरणात आठ वर्ष होत आली आहेत या आठ वर्षात निर्भयाच्याअशांत आत्म्याने त्यांचा बदला घ्यायला हवा होता. पण तसे घडले नाही.

       त्यामुळे आत्मा ही संकल्पना अशा प्रकरणात पूरती बाजूला ठेवूया. मग आत्मा जर बाजूला ठेवला तर तिच्या आत्म्यास शांती लाभो हा मुद्दा शिल्लक राहत नाही. मग असे असेल तर न्याय मिळण्याची, न्याय मागण्याची विचारसरणी नक्कीच बदलण्यास मदत होईल गुन्हेगाराला योग्य शिक्षेची मागणी वाढेल.

      आत्मा ही संकल्पना अशा गुन्ह्यात बाजूला ठेवत असताना किंवा त्या अमान्य करत असताना तिच्या शांतीचा मुद्दा आपल्या उपस्थित होत नाही व त्यातून आपण ही संकल्पना बाजूला ठेवतो.

      त्यानंतर तिसरा मुद्दा आहे देहदंड दिला म्हणजे न्याय मिळाला ? म्हणजे कोणाला न्याय मिळाला ? वरील दोन प्रश्नांचा विचार केल्यास काही बाबी स्पष्ट व्हायला लागतील यात न्याय मिळाला हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दल पुढील दोन आपण समजून घेऊया.

    १. न्याय कोणाला देतोय.

    २. तो कॉनमार्फत देतोय.

    न्याय जिवंत व्यक्तीला देत नाही, म्हणजेच पीडितेचा आत्मा आहे व त्या आत्म्यास न्याय मिळावा म्हणून गुन्हेगारांना देहदंड केला जातो. येथे न्याय त्या व्यक्तीला दिला जातो का ? तर याचे उत्तर नकारात्मक येईल. म्हणजेच न्याय हा पीडितेला दिला जात नाही हे स्पष्ट होतेय (पीडित जिवंत नसताना). म्हणजेच न्याय पीडितेच्या आत्म्याला देतोय अस आपल मानण आहे. पण खरंच न्याय मिळतो का ? आत्मा ही मानसिक किंवा धार्मिक संकल्पना आहे. या प्रकरणापुरती ती बाजूला ठेवली तर हा न्याय होऊ शकेल का ?

         दुसरा मुद्दा न्याय कोणामार्फत दिला जातो ? व कोणाला दिला जातो ? मुळात न्याय दिला जातो असं म्हणण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही असे मला वाटते. यात गुन्हेगाराला शिक्षा होते मग येथे न्यायाचा मुद्दाच उपस्थित होत नाही. कारण अत्याचारपीडित व्यक्तीशी घडलेला कोणताही प्रसंग  कोणत्याही गोष्टींने तो रद्द होऊ शकत नाही किंवा नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे झालेली हानी भरून निघू शकत नाही. मग असे असताना त्या शिक्षकांच्या बदल्यात न्याय हा शब्द आपण कसा वापरू शकतो ?  शिक्षा देणारी व्यवस्था ही अस्तित्वात असलेल्या घटकांनाच शिक्षा देते. व्यवस्था फक्त शिक्षा देण्याचे काम करते. ते सुद्धा  अधार्मिक संकल्पनांना. मग आपण धार्मिक बाबीसाठी संविधानिक रित्या न्याय मागतो व न्याय मंडळाकडून गुन्हेगाराला देहदंडाची शिक्षा झाली म्हणजे न्याय मिळाला असं समजतो. पण हे चुकीचं आहे.

      देहदंड झाला  म्हणजे त्या व्यक्तीच अस्तित्व नष्ट होते. एखादा व्यक्ती मृत्यू पावतो म्हणजे तो पृथ्वीतलावरील प्रत्येक बाबीतून मुक्त होतो.

      देहदंड झाला  म्हणजे त्या व्यक्तीच अस्तित्व नष्ट होते. एखादा व्यक्ती मृत्यू पावतो म्हणजे तो पृथ्वीतलावरील प्रत्येक बाबीतून मुक्त होतो.हिंगणघाट येथील पीडितेचा मृत्यू झाला आणि पुन्हा काही मुद्दे चर्चेला आले त्यात प्रेम महिलेवरील बलात्कार महिला असुरक्षित झाले आहे आरोपीला शिक्षा या सर्व बाबींवर विविध स्तरांतून चर्चा होत आहे त्यासंदर्भात घेतलेला आढावा.... 

       जिवंत असताना जो त्रास होतो त्या त्रासामुळे त्याला केलेल्या गुन्ह्याच्या वापराबद्दल काहीही वाईट वाटत नाही, त्याला मृत्युदंड होईपर्यंत कदाचित वाईट वाटेल. पण त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे काय ? तो मेल्यानंतर त्याला कशाचा पश्चाताप होणार आहे. मानवी जीवनाच अंतिम सत्य आहे मृत्यू , या मृत्यूनंतर त्याला कोणत्याही प्रकारची जाणीव राहत नाही. मग असे असतानाही आम्ही त्याच्या मृत्यूचा आग्रह का धरतो ? याचा नक्कीच विचार व्हावा. भावनिक होऊन आम्ही एखाद्या प्रकरणात विचार न करता न्याय मागत असू तर तो नक्कीच चुकीचा ठरेल. यातून ती गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होण्यास मदत होईल असे वाटत नाही.

        कारण हैदराबादचे प्रकरण घडून फक्त दोन महिने झाले असताना सुद्धा हिंगणघाट च्या आरोपीच्या मनात काहीही भीती नव्हती,औरंगाबादचे प्रकरण, आंदोलनकर्त्यांमध्ये जाऊन हस्तमैथुन करणे, नागपूरच्या महिला डॉक्टर वर झालेला ऍसिड हल्ला. हे सर्व का ? मग विचार करा कोणत्याही गुन्हेगाराला देहदंड योग्य ठरेल का ? निर्भयाचे प्रकरण बाजूला ठेवून, अपराध्याच्या मनात भीती निर्माण होण्यासाठी हैदराबादचे प्रकरण समोर घेतले तर त्याच्या डोक्यात मृत्यू चा विचार डोक्यात नसेल का ? आला असेल तर मग तरी सुद्धा त्याने असा प्रयत्न का केला ? याचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. याचे उत्तर जर स्वतः शोधलात तर कदाचित तुम्ही सुद्धा देहदंडाच्या शिक्षेबद्दल नक्कीच विचार कराल. मानवाधिकार आयोगाच्या बाजूने विचार न करता जीवित मानवी मूल्यांच्या बाजूने विचार केल्यास याचे कारण लक्षात येईल.

      जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दलची वासना मेंदूवर प्रभावित होते अशा वेळी इतर कोणताही विचार किंवा त्याच्या परिणामाचा विचार डोक्यात नसतो. असे असताना  मन व मेंदू बधिर होतो. त्याला फक्त ती एकच गोष्ट दिसत असते.  तर शेजारी काय चाललंय याचं सुद्धा भान नसते. हे याच प्रकारात होते असे नाही तर प्रत्येक प्रकारच्या वासनेत असे होत असते.  वासना म्हणजे असते तरी काय ? तर वासना म्हणजे भूक. मग ती कोणत्याही प्रकारचे असो. अशावेळी माणूस तिथे स्वतःचं भान विसरून ती भूक नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. भूक ही नेहमी नैसर्गिकच असते असे नाही, काही वेळा ती जबरदस्तीने निर्माण करून ती भागवण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकारातून असे बलात्कारासारखे प्रकरण घडत असतात.

     तर मग असे असताना एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यामुळे असे प्रकरण भविष्यात घडणार नाहीत असे आपण कसे म्हणू शकतो. त्यामुळं या भुकेची संकल्पना मनातून काढून टाकणे गरजेचं आहे.

      कोणतीही गोष्ट घडत असताना त्या मागची काही कारणं असतात. ती कारणे जाणून घेऊन त्या कारणांवर जेव्हा हल्ला करू तेव्हा ते गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होईल. पण आम्ही असे गुन्हे घडण्यास  कोणती कारणे  जबाबदार आहेत किंवा कोणती मानसिकता कारणीभूत आहे याचे मूळ न शोधता आम्ही त्यांच्या फांद्यावर घाव घालत आहोत. अशा फांद्यावर घाव घालण्याने  कोणत्याही बाबी संपत नसतात. जसा भावनेच्या भरात गुन्हा घडतो तसेच भावनेच्या भरात न्याय मागून आपण पुन्हा दुसरा गुन्हा तर घडवत नाहीत ना ?

     त्या कारणांचा विचार न करता सरळ सरळ देहदंडाची शिक्षा मागतोय. अन्याय अत्याचाराची प्रकरणे पाहता काही बाबी लक्षात येतात ती म्हणजे, अत्याचारपीडित हा ठराविक वयातील आहे अशी बाब नाही. तर तो  चार महिन्याच्या मुलीपासून ते वयाच्या शेवटच्या प्रवासाकडे असणाऱ्या महिलांवर व अशा प्रकारचे अत्याचार होत आलेले आहेत. त्यातील दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त स्त्रीच नाही तर पुरुष सुद्धा या प्रकाराचे बळी पडलेल्या आहेत.  मग मानसिकता फक्त स्त्रियांच्याच बाबतीत  नाही तर पुरुष सुद्धा  या प्रकाराचे बळी पडलेल्या आहेत. मानसिकता फक्त स्त्रीयासंदर्भात च आहे असे नाही तर ती भोगण्यासंदर्भात आहे. या मानसिकतेला नष्ट करायचे असेल तर देहदंड हा पर्याय कसा होऊ शकेल ? हैदराबाद प्रकरणात एन्काऊंटर झाला पण तरीही असे प्रकरण घडतच आहेत. प्रत्येक तासाला असे दोन प्रकार उघडकीस येत आहेत.मग उघडकीस येत नाहीत असे प्रकरण किती असतील याचा विचार करणे गरजेचे आहे.

      अशा उघडकीस न येणार्‍या व पीडित जिवंत असलेल्या प्रकरणाचे काय याबद्दल विचार करणे खूप गरजेचे आहे. म्हणून या भावनिक मागणीवर प्रत्येक नागरिकाने विचार करावा व न्यायालयाने या बाबीचा विचार करून या संदर्भात योग्य ती शिक्षा द्यावी. न्यायासंदर्भात पुढील भागात...

© जी.संदीप(गोणार,नांदेड)

            9552803980

Tuesday, January 25, 2022

संविधान.

 आनंदाला उधाण आल असेल

तिरंगा नभात फडकणार असेल

मी जे हक्क आणि अधिकार देतोय

त्यामुळं तुमची स्वप्नपूर्ती होत असेल

बाबासाहेबांच्या कष्टाचं फळ

उपभोगताय जीवनभर तुम्ही

त्या हक्क आणि अधिकारासाठी

संघटित राहताय ना तुम्ही ?

काय ? संविधानामुळ तुम्हास

पूर्णपणे हक्क आणि अधिकार मिळत नाहीत.

याचा अर्थ तुम्ही स्वतः अद्याप

हवे तेवढे जागृत झालेच नाहीत.

तुम्हाला सन्मानाचे जगणे मिळत नाही

यात माझा काय दोष

अबे, मुर्खानो मताधिकार बजावताना 

तुम्हीच असता की रे बहोष

तुमच्या कर्टीव्यांच खापर

माझ्या डोक्यावर फोडू नका

मला समजावून घेटल्याविना

हा सोहळा साजरा करू नका.

अरे संविधान हा तुमचा

मुलग्रंथ असायला पाहिजे

त्यातील कर्तव्य हक्क अधिकार

जाणून घ्यायला पाहिजे.

कर्तव्य, हक्क आणि अधिकार जाणून घेऊन

त्याची अंमबजावणी करण्यास भाग पाडा.

अन्यथा तुम्ही तुमच्या अस्मितेस

कायमचे असेच मातीत गाडा

असा सोहळा साजरा केल्याने

तुमचे भविष्य बहरास येणार नाही

माझी अंमलबजावणी योग्य होत नसेल

तर मला तीळभरही आनंद होणार नाही.

©जी.संदीप(गोणार,नांदेड)

Sunday, January 2, 2022

सावित्रीबाई जयंती विशेष : स्त्रीशिक्षण व वास्तव

 एखादी समस्या जाणून घेऊन त्या समस्येवर उपाय काढणारे त्या काळातील समाजसुधारक म्हणून फुले दाम्पत्यांचं नाव घेतलं जातं. म्हणजेच आम्हाला शिकण्याचा अधिकार नसताना आमच्यासाठी शिक्षण उपलब्ध करून देण्याच काम फुले दाम्पत्याने केले. हे काम करत असताना त्यात महत्वाचा वाटा जो होता तो म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा. पण हे ऐकून वाचून आम्हाला गुळ-गुळीत झालेले शब्द आहेत. त्यातून जी प्रेरणा भेटायला पाहिजे ती आम्हाला भेटत नाही. म्हणजे आम्हाला या शब्दातील भाव काढून टाकून जो फक्त अक्षर आहेत तेवढेच वाचतोय आणि त्यातून आम्हाला काहीही प्रेरणा मिळत नाही अस झालंय. कोणत्याही महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी असेल तर कोण काय बोलेल याचा अंदाज श्रोता वर्ग लावत आहे. म्हणजे आपण काय सांगणार हे आता ऐकणाऱ्याला कळत आहे. मग हा घोटीव इतिहास किती वर्षे सांगायचा. सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगावर शेण,दगड, गोटे यांचा मारा सहन केला आणि आमच्यासाठी शिकवण्याचा काम चालूच ठेवले. या शब्दातून आम्हाला फक्त काहीवेळा ऊर्जा मिळते पण त्यांच्या या कार्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे परिस्थितीनुसार आपल्याला कामे करावी लागतील. जर आम्हाला खरचं कामे करायची असतील तर परिस्थितीला बद्दलवायचे असेल तर इतिहासावर नाही तर वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागते. आम्ही इतिहास सांगत असताना फक्त इतिहासावरच लक्ष केंद्रित करतोया भविष्याचा आमच्याकडे काहीही संबंध नाही असं दिसतंय. अशाने आमची अधोगती,द्वेषभाव, विषमता नष्ट होणारच नाही. मग आम्हाला खरंच जर या देशात समतामुलक व्यवस्था निर्माण करायची असेल तर आम्हाला इतिहास जरूर सांगावा लागेल पण तो सांगत असताना ज्या शिक्षणाची गरज फुले कुटुंबियांना जाणवली त्याचा उद्देश पूर्ण झाला का ? नसेल झाला तर मग आम्ही कुठे आणि का कमी पडतोय याच चिंतन आम्ही का करत नाही ? याचा जेव्हा विचार करतो तेव्हा अशी शंका येते की आम्हाला राजकीय पोळ्या भाजून पोट भरायची आहेत त्यामुळं आम्ही अस काहीही करत नाही. कदाचित ही शंका प्रत्येक वेळी लागू होणार नाही. ही जर शंका खरी नसेल तर त्याच स्पष्टीकरण द्या... जर असेल खरी तर ही शंका नाहीशी करण्यासाठी काम करा.

     आज प्रत्येक स्त्री शिक्षण घ्यावी म्हणून आपण धडपड करतोय पण ही शिकलेली स्त्री समतेच जीवन जगत आहे का ? तिला समाजात सन्मानाची वागणूक भेटते का ? समाजात स्त्री शिकली ते फक्त आणि फक्त आर्थिक सोर्स म्हणून पण कमावणाऱ्या स्त्रीने कधी फुले दाम्पत्याच्या त्यागाचा किंवा ध्येय उद्दिष्टांचा विचार केलाय का ? जर ही स्त्री अशा कोणत्याही गोष्टीचा विचार करत नसेल तर तुम्हाला आज जयंती साजरी करण्याचा काय अधिकार आहे ? तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असेल तर डॉक्टर ती तुम्ही खाऊ नका अस सांगतात आणि तुम्ही ते ऐकता. पण आयुष्याभर आम्हाला काही चालीरितींमुळे त्रास होतो पण तरीही आम्ही त्या चालीरीती सतत चालूच ठवतो. या विचारांमुळे होणाऱ्या ऍलर्जी साठी तुम्ही कोणत्या गोष्टी करणं थांबवलं ? म्हणजे आम्हाला शिक्षण भेटलं, उच्च शिक्षणाच्या जोरावर आम्हाला नोकरी भेटली पण ही नोकरी करत असताना आमच्या सन्मानाचे काय ? मग आम्ही शिकलेल्या शिक्षणाचा फायदा काय ? आपण शिकल्यानंतर आपल्यात वैचारिक परिवर्तन व्हायला पाहिजे. हे होणं गरजेचं आहे. आजची स्थिती बघता आज आम्हाला कोणत्याही संजसुधारकांची गरज नाही. कारण ज्ञानाचे दरवाजे आमच्यासाठी 24 तास खुले आहेत. आम्हाला हवे तेव्हा हवे ते ज्ञान घेऊ शकतो म्हणजे आम्हाला आता कोणतेही कार्य करण्यासाठी ज्ञान उपलब्ध होत आहे. फक्त गरज आहे ती एका चिंगरीची आणि तो चिंगरी निर्माण करणारा शब्द आहे  "का ?" हा एक शब्द जर वापरत गेलात तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यासोबत घडत असलेल्या अन्यायाला वाचा फोडतो मग तो स्त्रीवरील किंवा पुरुषावरील असो. त्यामुळं आज आम्हाला आमचा विकास करण्यासाठी कोणत्याही त्रयस्थाची मदत लागणार नाही यातून महापुरुषांना अपेक्षित समाज घटक होऊ व आदर्श समाज घडवू.

✍️✍️@ जी.संदीप (नांदेड)

            9552803980

Thursday, November 18, 2021

लेख - डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान निर्मितीचा प्रवास

दि. 26 नोव्हेंबर संविधान दिन धर्मनिरपेक्ष असणाऱ्या भारत देशामध्ये नोव्हेंबर 2015 पासून सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नागरिकांच्या संविधानिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो. दि.26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस असा प्रदीर्घ संघर्ष करून जगातील सर्वात शक्तिशाली मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशाचं संविधान लिहून संविधान सभेला सादर केले. भारतासारख्या देशात स्वातंत्रपूर्व काळात जातीयता, विषमता, अंधश्रद्धा आशा खुळचट विचारांनी समाज प्रस्थापितांच्या आधिपत्याखाली वावरत होता पिढ्यानपिढ्या गुलामगिरीच्या बेड्या अडकलेल्या समाजाला नव्हे तर संपूर्ण मानव जातीला स्वाभिमानाने जगता यावे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 60 देशाच्या घटनेचा अभ्यास केला त्यात एक प्रस्तावना 395 कलमे 8 अनुसूची 22 भाग असलेलं संविधान लिहून या भारत देशाला समर्पित केलं संविधान सभेत निवडून जात असताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये सरदार पटेल इतर काँग्रेसचे नेते आणि डाव्या पक्ष्याच्या विरोधामुळे बाँबे प्रांतातून निवडुन येऊ शकले नाही त्यामुळे त्यांना संविधान सभेत निवडून आणण्यासाठी  बंगाल प्रांतातील दलित नेत्यांनी प्रयत्न केला अविभाजीत बंगाल प्रांतातील जेस्सोर व खुलना या मतदार संघातुन निवडून आलेल्या जोगेंद्रनाथ मंडल यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला त्यामुळं तेथून डॉ बाबासाहेब आंबेडकर अँग्लो इंडियन अपक्ष दलित मुस्लिमांच्या पाठींब्यामुळे निवडून आले मात्र भारताच्या फाळणीमुळे बंगाल मधील जेसोर व खुलना हा प्रदेश पाकिस्तानात गेल्यामुळे तांत्रिक दृष्ट्या आंबेडकर पाकिस्तान सभेचे सदस्य बनले मात्र बाबासाहेबानी या जागेचा राजीनामा दिला त्यामुळे बाबासाहेब संविधान सभेचे सदस्य राहिले नाही मात्र तत्पूर्वी संविधान सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत जे काम केले होते ते काम दुसरे कोणीही करु शकत नाही अशी जाणीव सरदार पटेल पंडित जवाहरलाल नेहरू डॉ राजेंद्र प्रसाद यांना झाली त्यामुळे या तिघांनी बाँबेच्या एम आर जयकर यांना राजीनामा देण्यास भाग पाडले मग डॉ बाबासाहेब आंबेडकर तेथून जुलै 1947 मध्ये संविधान सभेवर निवडून आले असा संघर्ष जो आहे बाबासाहेबाना संविधान सभेवर जाण्यासाठी करावा लागला डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष होतेच पण त्याचबरोबर सल्लागार समिती मूलभूत हक्क उपसमिती अल्पसंख्याक उपसमिती संघराज्य घटना समिती आशा वेगवेगळ्या समित्यांवर देखील काम केले बाबासाहेब म्हणतात की संसदेला कायदा करण्याचे तसेच घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत पण तेवढ्या प्रमाणात संसद सार्वभौम आहे मात्र संसदेने केलेले कायदे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करीत असतील तर ते बाद ठरविण्याचा देखील जो अधिकार आहे तो न्यायालयाना आहे पण तेवढ्या प्रमाणातच न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे म्हणजेच भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही अशा पद्धतीचा सखोल विचार करून बाबासाहेबानी संविधान लिहिले भारतीय संविधानात मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत याची मांडणी करताना बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री पुरुष समानता धर्म वंश जात शिक्षण रोजगार याचा सविस्तर विचार केला संविधानात मूलभूत हक्क हे व्यक्ती कल्याण संवर्धित करण्याच काम करताना दिसतात तर मार्गदर्शक तत्वे समाजकल्याण संवर्धित करताना दिसतात डॉ बाबासाहेब आंबेडकरानी विषमता पोषण दारिद्र्य यांचे जे मूळ आहे जातीव्यवसस्थेत आहे हे शोधून काढण्याचं काम केलं आंबेडकर म्हणतात जातीचा राक्षस नष्ट केल्या शिवाय समाजाची राजकीय सुधारणा व आर्थिक सुधारणा होणार नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत हक्काच्या माध्यमातून मानवाला संविधानिक संरक्षण प्राप्त करून दिले आहे के व्ही राव म्हणतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मार्गदर्शक तत्वाचा उल्लेख केला आहे त्याचा हेतू हा भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवीन्याचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहीत असताना शेवट पर्यंत मानवी कल्याणाचा विचार केला एवढेच नव्हे तर ऑक्टोबर 1948 मध्ये डॉ बाबासाहेबानी हिंदू कोड बिल घटना समितीच्या विधिमंडळा समोर मान्यतेसाठी मांडले होते बाबासाहेब म्हणतात या हिंदू बिलाने हिंदू समाजाची सामाजिक क्रांती होईल हे बिल भारतीय घटनेपेक्षा शंभर पटीने अधिक देशाला उपकारक ठरेल मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री गोळवलकर यांनी या बिलाला शेवट पर्यंत विरोध करीत राहिले 17 सप्टेंबर 1951हे विधेयक लोकसभेत मांडले पण पुढे पण सरदार पटेल व शामा प्रसाद मुखर्जी यांनी विरोध केला विधेयक मंजूर झाले नाही त्यामळे बाबासाहेबानी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला डॉ बाबासाहेब आंबेडकर महाबोधी या मासिकमध्ये हिंदू स्त्रियांची अवनती व उन्नती हा लेख लिहिला त्यात हिंदू स्त्रियांच्या अवनतीला बुद्ध नाही तर मनु जबाबदार आहे असे परखड मत मांडले बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेऊन सर्व जाती धर्माला संरक्षण असलेलं जगातील सर्वात बलशाली संविधान देशाला दिलेलं असताना अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतो बाबासाहेब आंबेडकर जर माझ्या देशात जन्माला आले असते तर त्यांचा चेहरा मी माझ्या राष्ट्रध्वजावर लावला असता तिकडे रशियाचा राष्ट्राध्यक्ष स्वतःच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा धडाकेबाज फोटो लावतो कोलंबिया युनिव्हर्सिटी अगदी अभिमानाने सांगते की आमच्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकणारा विध्यार्थी एका देशाचा घटनाकार झाला आणि ज्या  भारत देशाचं संविधान लिहीत असताना बाबासाहेबानी स्वतःच्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता आयुष्यभर संघर्ष केला तर या भारत देशात संसदेसमोर संविधानाच्या प्रति जाळनाऱ्या घटना घटताना दिसतात तर या घटना म्हणजे आमच्या देशासाठी लाजिरवाणी आहे खरच या देशामध्ये भारतीय संविधानाच्या मूल्याची आमलबजावणी करण्याचं काम जर कार्यकारी मंडळाने जर केले असते तर भारत हा जगातील डॉ ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील शक्तिशाली देश बनला असता पण या देशात जाणीवपूर्वक संविधानाच्या विरोधात वक्तव्य केली जातात आरक्षणाच्या नावाखाली एका विशिष्ट समाजात द्वेष पसरवन्याचा कार्यक्रम जो आहे हिंदुत्ववादी संघटना करताना दिसतात मग ते हिंदू महासभा असेल किंवा बजरंग दल असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल संविधानिक मूल्यांची आमलबजावणी होताना दिसत नाही तर जातीय दंगली घडवणे दलित अत्याचार मुस्लिम अत्याचार या घटना घडताना दिसत आहेत उदा. उत्तरप्रदेश मध्ये गो हत्येच्या नावाखाली मोहमद आखलाकला जीव गमवावा लागला तर झारखंड मध्ये संतोषी कुमारी या मुलीला भात भात म्हणून स्वतःच्या आईच्या मांडीवर जीव द्यावा लागला ही परिस्थिती पाहायला मिळते. आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 74 वर्ष पूर्ण होत आहेत तरी या देशात रोजगार शिक्षण दारिद्र्य विषमता अत्याचार भूकमंदीचा प्रश्न याचा जो स्तर आहे तो परिवर्तनात्मक दिसत नाही देशात शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण वाढताना दिसत आहे सैनिकाच्या शहिदाच प्रमाण वाढत आहे बेरोजगारी ने तर मर्यादा पार केलेल्या आहेत अर्थव्यवस्था दर घसरताना दिसत आहे आणि जे देशात जे आहे प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण करण करून हा देश जो आहे भांडवल दाराच्या घशात ओतला जात आहे या देशाला विकासाईवजी उध्वस्त करताना काही गोष्टी दिसत आहेत आणि शेवटी जर या देशात जर अत्याचार अन्याय हा प्रकार राहिला नसता तर जयभीम सारखे चित्रपट निघाले नसते जयभीम चित्रपटाने भकांमपणा थिलरपणा दाखविला नाही तर जातीयता व त्या सोबत असणारा द्वेष हे भारताच्या परंपरेत आहे हे नाकारता येत नाही जयभीम चित्रपटात वास्तविकता आहे स्वतंत्र समता बंधुता न्याय हे भारतीय संविधानाच जे मूळ आहे यात दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध शिवाजी महाराज महात्मा फुले राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यातून जी स्वतंत्र समता बंधुता न्याय ही तत्वे दिसत होती ती तत्वेडॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक रूपाने आपल्या पुढे दिली आहेत त्या मुळे मी तर म्हणतो या समाजाला किंवा या देशातील प्रत्येक जातीधर्मातील मानवाला जर आनंदाने स्वाभिमानाने जगायचे असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं भारतीय संविधानच लाभदायक ठरू शकेल.

लेखक - मा. गोणारकर राष्ट्रपाल

Monday, August 30, 2021

.....आणि_स्वातंत्र्याचा_महिना_संपला

15 ऑगस्ट ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं

पण तरीसुद्धा आनंदी नव्हतो आम्ही

म्हणून प्रजासत्ताकाचा सोहळा

धूमधडाक्यात साजरा करतो आम्ही

पण तरीही प्रजासत्ताकाची मुहूर्तमेढ आहे

15 ऑगस्ट याच दिनी

म्हणून उत्साह संचारतो

काही भारतीयांच्या अंगी

स्वातंत्र्याचा महिना संपला

देशभक्तीचे गुणगान गाणे बंद करू

दुसऱ्या पेक्षा माझाच जास्तीत जास्त कसा फायदा होईल

हे पाहणे आम्ही कसे विसरू

भारत देश म्हणजे दक्षिणेच्या टोकापासून

उत्तरेच्या टोकामधील भौगोलिक परिसर होय

त्यातील जिवंत माणसे देश या संकल्पनेत

समाविष्ट करण हे चुकीचं होय

म्हणून या देशात पहिल्यांदा

माझी प्रत्येक हौस पूर्ण झाली पाहिजे

इतर नागरिक मेले तरी मला काय पर्वा

माझी हौस पूर्ण करून घेणे हेच ध्येय असल पाहिजे.

मीच जिवंत नसलं, माझीच सप्न पूर्ण होत नसतील

तर देशाबद्दलच्या अभिमानाच काय लोणचं घालायचं काय ?

माझाच इथ विकास नसल तर

दुसरा प्रत्येक जन भकास झाला तरी त्याचं मला काय ?

अशीच मानसिकता इथ

करोडोंच्या मनात रुजलेली दिसतेय

म्हणून जो तो कस लुबडता येईल देशाला

हेच विचार करत जगताना दिसतोय

स्वातंत्र्य दिनी मात्र झेंड्याखाली शासक प्रशासक

पांढऱ्या कपड्यात काळी मानसिकता घेऊन मिरवतोय

खरा झेंडा मात्र सामान्यांच्या हृदयात

मलीन कपड्याचा सल्यूट घेत फडकतोय

कशाचा स्वातंत्र्य दीन

आणि कशाच आलंय स्वातंत्र्य

इंग्रज निघून गेले कायमचे पण

दिडशहाने हलवत आहेत देशाचं सूत्र

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

हे सांगत फिरतात काही जण

शासक प्रशासक म्हणजे आहेत नोकर

हे सुद्धा जाणून घ्यावं प्रत्येक जण

म्हणून मित्रांनो आपणही देशाला लुबाडूया

पण त्याआधी थोडीशी गुंतवणूक करूया

निसर्ग संवर्धनासाठी झाडे लावूया,

गरजा मर्यादीत ठेवूया,

दुसऱ्याला आपल्या जगण्यातील रुबाब दाखवणे टाळूया

गरजेएवढेच प्रत्येक गोष्ट मिळवत राहूया,

प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळेल यासाठी प्रयत्न करुया

देश ओस पडूद्या आपल्याला त्याच काय देणं-घेणं

जे सोबत आहेत त्याच्यासाठी मात्र आपण नेहमी पुढं येऊया.

देशाचं वाटोळं होऊद्या

आपल्याला काय देणं घेणं

आपण मात्र आपल्या परिसराला

उत्तम आणि पोषक असे बनवूया

आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे

त्या गोष्टींची निर्मिती आपणच करुया

देशावर आक्रमणे झाली तर होऊद्या

आपल काय जातंय त्यात

आपण फक्त आपल्या शेजाऱ्यांसोबत

परिसरातल्यांसोबत एकात्मतेने राहूया

जात धर्म पंथ यामुळं देशात होत राहूद्या वाद विवाद

आपण फक्त हिंदू, मुस्लिम, बौध्द, शीख, इसाई, ख्रिश्चन

अशा वेग वेगळ्या जाती धर्माचे एकत्रित शेजारी शेजारी राहूया

रोटीच नात एक मेकांशी ठेवून आनंदाने इथ जगूया

बेटीच्या व्यवहाराच बघुया नंतर कधीतरी

आधी रोटीच्या व्यवहाराच नक्की करून घेऊया

मग काय घेणं देणं देशाचं आम्हाला या

आम्ही सुखाने नांदू लागल्यानंतर

जात धर्माच्या नावावर लढणाऱ्याना लढत राहू द्या....

स्वातंत्र्याचा महिना संपत असताना 

आम्ही स्वातंत्र्य आहोत का हे बघुया

नसल आम्हाला स्वातंत्र्य तर सर्वजण मिळून

एकत्रितपणे स्वातंत्र्य जगत राहूया....

मानसाशी मानसासारखे वागुया..........

© जी.संदीप (गोणार,नांदेड)

Tuesday, July 27, 2021

सगळं कसं शांत आहे...!

             देशातील वातावरण पाहता सध्या, मीडियावर ना कोरोनाची भीती दाखवल्या जातेय, ना कुठल्या धर्माचा वाद, ना  कुठली हत्या, ना आहे चर्चेत आत्महत्या, ना आहे कुठे जय श्री राम चा जयघोष, ना आहे वंदे मातरम् ची चर्चा. ना घडतं आहे देशात कुठेही अन्याय अत्याचार. एवढा आमचा देश शांत झाला का राव ?

          #आपण_जिवंत_तर_आहोत_ना ? एवढी भयाण शांतता ? मी कोणते सप्न तर पाहत नाही ना ? असा प्रश्न मनाला सतावत आहे. 

           आज प्रसार माध्यमे, सोशल मीडिया पण शांत झोप घेतोय. कुठलाच कोणताच सुगावा मीडिया च्या हाती लागला नसल तर मग आता मीडियाने सामाजिक वास्तवाच्या बातम्या का देऊ नयेत ? सोशल मीडियावर आपल्या दैनंदिन प्रश्नावर चर्चा का होऊ नये ? सकाळी उठल्यापासून रात्री शांत झोप येईपर्यंत नागरिकांच्या जीवनात अनेक समस्या आ वासून उभ्या असतात त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना हवं असत. त्या प्रश्नाचं उत्तर मिळवणं हा प्रत्येक नागरिकांचा अधिकार असतो याबद्दल मिडीयाला जाणीव होत नाहीं ? अशा #मिडीयाला_आपण_आपल्या_घरात_स्थान_का_देतो ? सकाळी झोपीतून उठल्यानंतर चहा सोबत जशी खारी किंवा बिस्कीट घेतो तसच आता न्युज पेपर सोबत हवाच असतो. न्युज पेपर काही वेळ चाळल्यानंतर सहज तोंडातून उद्गार येतात. आज पेपर मध्ये काही विशेष नाही. टीव्ही पाहत असू तर आज बातम्यांमध्ये काही विशेष दिसत नाही. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा ?

           देशात कुठ काही अराजक घडल आणि ते वर्तमान पत्रात अथवा टीव्ही चॅनेल वर आल म्हणजे काहीतरी घडलं असा अर्थ आपण घेतोय का ? #देशात_दररोज_खुप_काही_घडतय,  ज्या तुम्ही काही घडल्याच्या बातम्या एखादेवेळी वाचता ना त्या घटना दररोज घडत असतात पण त्यांना मीडिया महत्व देत नाही ? का देत नाही ? याबद्दल आपण कधी विचार केलाय का ? देशात निर्भया आणि कोपर्डीच घडली का ? असे प्रकार देशात रोज घडतं आहेत. पण त्याला महत्व दिल्या जात नाही. देशात रोज भ्रष्टाचार होतात पण बातमी नाही. आत्महत्या रोज होतात, धर्म-जाती वरून इथ रोज भांडण होतात. पण महत्व दिल्या जात नाही, रोजगार नाही, घेतलेल्या शिक्षणाला महत्व नाही, गावा-गावात वीजपुरवठा नाही, रस्ते नाहीत. तरी आपण सगळेजण शांत आहोत, का ? कारण धर्माचा कोणताही मुद्दा यात नाही, राजकारणाचा कोणताही मुद्दा यात नाही. यामुद्द्यावर जर आवाज मोठा झाला तर देश विकासाकडे जाईल. देश विकसित झाला म्हणजे धर्माचा गव-गवा थांबेल धर्माच्या मुद्द्यावरून राजकारण करता येणार नाही.

             हे सर्व #घडवून_आणल्या_जाते_राजकारण्यांमार्फत. जे आपले सेवक आहेत ते मालक होत असतील तर आपल्यावर नेहमी गुलाम म्हणून जगण्याचीच वेळ येते. मग देशात सत्ता आपली असो अथवा परकियांची त्याने काही फरक पडत नाही. काही दिवसांवर स्वातंत्र्य #दीन येतोय आनंदाने आम्ही देशभक्तीचे गाणे ऐकून देशाबद्दल प्रेम व्यक्त करतो. अशाने आपला विकास होत नाही. देशभक्ती म्हणजे देशाचा गवगवा करणे नव्हे देशभक्ती म्हणाजे देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा विकास करण्यासाठी शासनाला प्रवृत्त करणे होय. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नागरिकांना संबोधित केल्याने त्यांना गोड गोड शब्द बोलून मोहित केल्याने देशातील नागरिकांचा विकास होत नाही. हे त्यांना नक्की माहीत आहे. पण आम्ही मूर्ख, त्यांच्या गोड बोलण्याने भुलून जातो आणि प्रधानमंत्र्याने किती छान भाषण केले असा गवगवा करत तो दिवस आनंदात घालवतो. मग पुन्हा प्रजासत्ताक दिन येतो. पुन्हा आमची देशभक्ती जागी होते.एका दिवसाचं देश प्रेम संपत आणि पुन्हा आम्ही आमच्या दावणीला बांधले जातो.

            ही मानसिकता बदलत नसाल तर आपल्याला हक्क आहे #कर्जबाजारी_होण्याचा, आपल्याला अधिकार आहे शांत राहून #शासनाची_गुलामी_सहन_करण्याचा, आपल्याला पूर्णपणे मोकळीक आहे #आयुष्य_दुःखात_जगण्याचा, तुम्हाला #गरिबीतच_जगण्याचा आणि सर्वात मुक्त अधिकार प्राप्त आहे तुम्हाला #आत्महत्या_करून_जीवन_संपवण्याचा. आमचा इतिहास रडण्याचा नाही तर लढण्याचा आहे सांगणारे सुद्धा रडत बसतात.यावरून इतिहासाचा किती आणि कसा उपयोग करून घेता हे लक्षात येतं आहे.

Monday, May 24, 2021

भाऊ

वादळातील सोबती असतो भाऊ

संघर्षातील साथी असतो भाऊ

निर्णय घेतल्यानंतर प्रत्येक परिस्थितीत

साथ देत असतो भाऊच

"तू कर जे होईल ते पाहून घेऊ"

अशी प्रेरणा देत असतो भाऊच

प्रत्येक संघर्षात आत्मविश्वास 

वाढवत असतो भाऊच

कुटुंबास आकार येतो खूप मोठा

भावाच्या पुढाकारामुळं

उगचं नाही म्हणत कुणी

घर सुधारेल त्याच्यामुळं

जबाबदारीच्या ओझ्याखाली

अपेक्षांना दूर ठेवतो भाऊ

स्वतःच्या स्वप्नांचा करून चुराडा

सर्वाना सोबत घेऊन चालतो भाऊ

भाऊच बनतो सर्वात जवळचा मित्र

गुरु आणि कधी आई-बाप सुद्धा

नसेल आयुष्यात भावाची सोबत सदा

तर प्रिय वाटाया लागेल नरक सुद्धा

©जी.संदीप (गोणार, नांदेड)

              ९५५२८०३९८०

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...