देशातील वातावरण पाहता सध्या, मीडियावर ना कोरोनाची भीती दाखवल्या जातेय, ना कुठल्या धर्माचा वाद, ना कुठली हत्या, ना आहे चर्चेत आत्महत्या, ना आहे कुठे जय श्री राम चा जयघोष, ना आहे वंदे मातरम् ची चर्चा. ना घडतं आहे देशात कुठेही अन्याय अत्याचार. एवढा आमचा देश शांत झाला का राव ?
#आपण_जिवंत_तर_आहोत_ना ? एवढी भयाण शांतता ? मी कोणते सप्न तर पाहत नाही ना ? असा प्रश्न मनाला सतावत आहे.
आज प्रसार माध्यमे, सोशल मीडिया पण शांत झोप घेतोय. कुठलाच कोणताच सुगावा मीडिया च्या हाती लागला नसल तर मग आता मीडियाने सामाजिक वास्तवाच्या बातम्या का देऊ नयेत ? सोशल मीडियावर आपल्या दैनंदिन प्रश्नावर चर्चा का होऊ नये ? सकाळी उठल्यापासून रात्री शांत झोप येईपर्यंत नागरिकांच्या जीवनात अनेक समस्या आ वासून उभ्या असतात त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना हवं असत. त्या प्रश्नाचं उत्तर मिळवणं हा प्रत्येक नागरिकांचा अधिकार असतो याबद्दल मिडीयाला जाणीव होत नाहीं ? अशा #मिडीयाला_आपण_आपल्या_घरात_स्थान_का_देतो ? सकाळी झोपीतून उठल्यानंतर चहा सोबत जशी खारी किंवा बिस्कीट घेतो तसच आता न्युज पेपर सोबत हवाच असतो. न्युज पेपर काही वेळ चाळल्यानंतर सहज तोंडातून उद्गार येतात. आज पेपर मध्ये काही विशेष नाही. टीव्ही पाहत असू तर आज बातम्यांमध्ये काही विशेष दिसत नाही. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा ?
देशात कुठ काही अराजक घडल आणि ते वर्तमान पत्रात अथवा टीव्ही चॅनेल वर आल म्हणजे काहीतरी घडलं असा अर्थ आपण घेतोय का ? #देशात_दररोज_खुप_काही_घडतय, ज्या तुम्ही काही घडल्याच्या बातम्या एखादेवेळी वाचता ना त्या घटना दररोज घडत असतात पण त्यांना मीडिया महत्व देत नाही ? का देत नाही ? याबद्दल आपण कधी विचार केलाय का ? देशात निर्भया आणि कोपर्डीच घडली का ? असे प्रकार देशात रोज घडतं आहेत. पण त्याला महत्व दिल्या जात नाही. देशात रोज भ्रष्टाचार होतात पण बातमी नाही. आत्महत्या रोज होतात, धर्म-जाती वरून इथ रोज भांडण होतात. पण महत्व दिल्या जात नाही, रोजगार नाही, घेतलेल्या शिक्षणाला महत्व नाही, गावा-गावात वीजपुरवठा नाही, रस्ते नाहीत. तरी आपण सगळेजण शांत आहोत, का ? कारण धर्माचा कोणताही मुद्दा यात नाही, राजकारणाचा कोणताही मुद्दा यात नाही. यामुद्द्यावर जर आवाज मोठा झाला तर देश विकासाकडे जाईल. देश विकसित झाला म्हणजे धर्माचा गव-गवा थांबेल धर्माच्या मुद्द्यावरून राजकारण करता येणार नाही.
हे सर्व #घडवून_आणल्या_जाते_राजकारण्यांमार्फत. जे आपले सेवक आहेत ते मालक होत असतील तर आपल्यावर नेहमी गुलाम म्हणून जगण्याचीच वेळ येते. मग देशात सत्ता आपली असो अथवा परकियांची त्याने काही फरक पडत नाही. काही दिवसांवर स्वातंत्र्य #दीन येतोय आनंदाने आम्ही देशभक्तीचे गाणे ऐकून देशाबद्दल प्रेम व्यक्त करतो. अशाने आपला विकास होत नाही. देशभक्ती म्हणजे देशाचा गवगवा करणे नव्हे देशभक्ती म्हणाजे देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा विकास करण्यासाठी शासनाला प्रवृत्त करणे होय. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नागरिकांना संबोधित केल्याने त्यांना गोड गोड शब्द बोलून मोहित केल्याने देशातील नागरिकांचा विकास होत नाही. हे त्यांना नक्की माहीत आहे. पण आम्ही मूर्ख, त्यांच्या गोड बोलण्याने भुलून जातो आणि प्रधानमंत्र्याने किती छान भाषण केले असा गवगवा करत तो दिवस आनंदात घालवतो. मग पुन्हा प्रजासत्ताक दिन येतो. पुन्हा आमची देशभक्ती जागी होते.एका दिवसाचं देश प्रेम संपत आणि पुन्हा आम्ही आमच्या दावणीला बांधले जातो.
ही मानसिकता बदलत नसाल तर आपल्याला हक्क आहे #कर्जबाजारी_होण्याचा, आपल्याला अधिकार आहे शांत राहून #शासनाची_गुलामी_सहन_करण्याचा, आपल्याला पूर्णपणे मोकळीक आहे #आयुष्य_दुःखात_जगण्याचा, तुम्हाला #गरिबीतच_जगण्याचा आणि सर्वात मुक्त अधिकार प्राप्त आहे तुम्हाला #आत्महत्या_करून_जीवन_संपवण्याचा. आमचा इतिहास रडण्याचा नाही तर लढण्याचा आहे सांगणारे सुद्धा रडत बसतात.यावरून इतिहासाचा किती आणि कसा उपयोग करून घेता हे लक्षात येतं आहे.






