दि. 26 नोव्हेंबर संविधान दिन धर्मनिरपेक्ष असणाऱ्या भारत देशामध्ये नोव्हेंबर 2015 पासून सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नागरिकांच्या संविधानिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो. दि.26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस असा प्रदीर्घ संघर्ष करून जगातील सर्वात शक्तिशाली मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशाचं संविधान लिहून संविधान सभेला सादर केले. भारतासारख्या देशात स्वातंत्रपूर्व काळात जातीयता, विषमता, अंधश्रद्धा आशा खुळचट विचारांनी समाज प्रस्थापितांच्या आधिपत्याखाली वावरत होता पिढ्यानपिढ्या गुलामगिरीच्या बेड्या अडकलेल्या समाजाला नव्हे तर संपूर्ण मानव जातीला स्वाभिमानाने जगता यावे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 60 देशाच्या घटनेचा अभ्यास केला त्यात एक प्रस्तावना 395 कलमे 8 अनुसूची 22 भाग असलेलं संविधान लिहून या भारत देशाला समर्पित केलं संविधान सभेत निवडून जात असताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये सरदार पटेल इतर काँग्रेसचे नेते आणि डाव्या पक्ष्याच्या विरोधामुळे बाँबे प्रांतातून निवडुन येऊ शकले नाही त्यामुळे त्यांना संविधान सभेत निवडून आणण्यासाठी बंगाल प्रांतातील दलित नेत्यांनी प्रयत्न केला अविभाजीत बंगाल प्रांतातील जेस्सोर व खुलना या मतदार संघातुन निवडून आलेल्या जोगेंद्रनाथ मंडल यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला त्यामुळं तेथून डॉ बाबासाहेब आंबेडकर अँग्लो इंडियन अपक्ष दलित मुस्लिमांच्या पाठींब्यामुळे निवडून आले मात्र भारताच्या फाळणीमुळे बंगाल मधील जेसोर व खुलना हा प्रदेश पाकिस्तानात गेल्यामुळे तांत्रिक दृष्ट्या आंबेडकर पाकिस्तान सभेचे सदस्य बनले मात्र बाबासाहेबानी या जागेचा राजीनामा दिला त्यामुळे बाबासाहेब संविधान सभेचे सदस्य राहिले नाही मात्र तत्पूर्वी संविधान सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत जे काम केले होते ते काम दुसरे कोणीही करु शकत नाही अशी जाणीव सरदार पटेल पंडित जवाहरलाल नेहरू डॉ राजेंद्र प्रसाद यांना झाली त्यामुळे या तिघांनी बाँबेच्या एम आर जयकर यांना राजीनामा देण्यास भाग पाडले मग डॉ बाबासाहेब आंबेडकर तेथून जुलै 1947 मध्ये संविधान सभेवर निवडून आले असा संघर्ष जो आहे बाबासाहेबाना संविधान सभेवर जाण्यासाठी करावा लागला डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष होतेच पण त्याचबरोबर सल्लागार समिती मूलभूत हक्क उपसमिती अल्पसंख्याक उपसमिती संघराज्य घटना समिती आशा वेगवेगळ्या समित्यांवर देखील काम केले बाबासाहेब म्हणतात की संसदेला कायदा करण्याचे तसेच घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत पण तेवढ्या प्रमाणात संसद सार्वभौम आहे मात्र संसदेने केलेले कायदे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करीत असतील तर ते बाद ठरविण्याचा देखील जो अधिकार आहे तो न्यायालयाना आहे पण तेवढ्या प्रमाणातच न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे म्हणजेच भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही अशा पद्धतीचा सखोल विचार करून बाबासाहेबानी संविधान लिहिले भारतीय संविधानात मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत याची मांडणी करताना बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री पुरुष समानता धर्म वंश जात शिक्षण रोजगार याचा सविस्तर विचार केला संविधानात मूलभूत हक्क हे व्यक्ती कल्याण संवर्धित करण्याच काम करताना दिसतात तर मार्गदर्शक तत्वे समाजकल्याण संवर्धित करताना दिसतात डॉ बाबासाहेब आंबेडकरानी विषमता पोषण दारिद्र्य यांचे जे मूळ आहे जातीव्यवसस्थेत आहे हे शोधून काढण्याचं काम केलं आंबेडकर म्हणतात जातीचा राक्षस नष्ट केल्या शिवाय समाजाची राजकीय सुधारणा व आर्थिक सुधारणा होणार नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत हक्काच्या माध्यमातून मानवाला संविधानिक संरक्षण प्राप्त करून दिले आहे के व्ही राव म्हणतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मार्गदर्शक तत्वाचा उल्लेख केला आहे त्याचा हेतू हा भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवीन्याचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहीत असताना शेवट पर्यंत मानवी कल्याणाचा विचार केला एवढेच नव्हे तर ऑक्टोबर 1948 मध्ये डॉ बाबासाहेबानी हिंदू कोड बिल घटना समितीच्या विधिमंडळा समोर मान्यतेसाठी मांडले होते बाबासाहेब म्हणतात या हिंदू बिलाने हिंदू समाजाची सामाजिक क्रांती होईल हे बिल भारतीय घटनेपेक्षा शंभर पटीने अधिक देशाला उपकारक ठरेल मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री गोळवलकर यांनी या बिलाला शेवट पर्यंत विरोध करीत राहिले 17 सप्टेंबर 1951हे विधेयक लोकसभेत मांडले पण पुढे पण सरदार पटेल व शामा प्रसाद मुखर्जी यांनी विरोध केला विधेयक मंजूर झाले नाही त्यामळे बाबासाहेबानी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला डॉ बाबासाहेब आंबेडकर महाबोधी या मासिकमध्ये हिंदू स्त्रियांची अवनती व उन्नती हा लेख लिहिला त्यात हिंदू स्त्रियांच्या अवनतीला बुद्ध नाही तर मनु जबाबदार आहे असे परखड मत मांडले बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेऊन सर्व जाती धर्माला संरक्षण असलेलं जगातील सर्वात बलशाली संविधान देशाला दिलेलं असताना अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतो बाबासाहेब आंबेडकर जर माझ्या देशात जन्माला आले असते तर त्यांचा चेहरा मी माझ्या राष्ट्रध्वजावर लावला असता तिकडे रशियाचा राष्ट्राध्यक्ष स्वतःच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा धडाकेबाज फोटो लावतो कोलंबिया युनिव्हर्सिटी अगदी अभिमानाने सांगते की आमच्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकणारा विध्यार्थी एका देशाचा घटनाकार झाला आणि ज्या भारत देशाचं संविधान लिहीत असताना बाबासाहेबानी स्वतःच्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता आयुष्यभर संघर्ष केला तर या भारत देशात संसदेसमोर संविधानाच्या प्रति जाळनाऱ्या घटना घटताना दिसतात तर या घटना म्हणजे आमच्या देशासाठी लाजिरवाणी आहे खरच या देशामध्ये भारतीय संविधानाच्या मूल्याची आमलबजावणी करण्याचं काम जर कार्यकारी मंडळाने जर केले असते तर भारत हा जगातील डॉ ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील शक्तिशाली देश बनला असता पण या देशात जाणीवपूर्वक संविधानाच्या विरोधात वक्तव्य केली जातात आरक्षणाच्या नावाखाली एका विशिष्ट समाजात द्वेष पसरवन्याचा कार्यक्रम जो आहे हिंदुत्ववादी संघटना करताना दिसतात मग ते हिंदू महासभा असेल किंवा बजरंग दल असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल संविधानिक मूल्यांची आमलबजावणी होताना दिसत नाही तर जातीय दंगली घडवणे दलित अत्याचार मुस्लिम अत्याचार या घटना घडताना दिसत आहेत उदा. उत्तरप्रदेश मध्ये गो हत्येच्या नावाखाली मोहमद आखलाकला जीव गमवावा लागला तर झारखंड मध्ये संतोषी कुमारी या मुलीला भात भात म्हणून स्वतःच्या आईच्या मांडीवर जीव द्यावा लागला ही परिस्थिती पाहायला मिळते. आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 74 वर्ष पूर्ण होत आहेत तरी या देशात रोजगार शिक्षण दारिद्र्य विषमता अत्याचार भूकमंदीचा प्रश्न याचा जो स्तर आहे तो परिवर्तनात्मक दिसत नाही देशात शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण वाढताना दिसत आहे सैनिकाच्या शहिदाच प्रमाण वाढत आहे बेरोजगारी ने तर मर्यादा पार केलेल्या आहेत अर्थव्यवस्था दर घसरताना दिसत आहे आणि जे देशात जे आहे प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण करण करून हा देश जो आहे भांडवल दाराच्या घशात ओतला जात आहे या देशाला विकासाईवजी उध्वस्त करताना काही गोष्टी दिसत आहेत आणि शेवटी जर या देशात जर अत्याचार अन्याय हा प्रकार राहिला नसता तर जयभीम सारखे चित्रपट निघाले नसते जयभीम चित्रपटाने भकांमपणा थिलरपणा दाखविला नाही तर जातीयता व त्या सोबत असणारा द्वेष हे भारताच्या परंपरेत आहे हे नाकारता येत नाही जयभीम चित्रपटात वास्तविकता आहे स्वतंत्र समता बंधुता न्याय हे भारतीय संविधानाच जे मूळ आहे यात दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध शिवाजी महाराज महात्मा फुले राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यातून जी स्वतंत्र समता बंधुता न्याय ही तत्वे दिसत होती ती तत्वेडॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक रूपाने आपल्या पुढे दिली आहेत त्या मुळे मी तर म्हणतो या समाजाला किंवा या देशातील प्रत्येक जातीधर्मातील मानवाला जर आनंदाने स्वाभिमानाने जगायचे असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं भारतीय संविधानच लाभदायक ठरू शकेल.
लेखक - मा. गोणारकर राष्ट्रपाल




