कोरोनाची साथ आणि भारतीय...
कोरोनाने जगभर थैमान घातले असताना, आपल्या देशात आटोक्यात यावा म्हणून शासन, प्रशासन व वैद्यकीय सेवा आपले प्राण पणाला लावून त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासंदर्भात घेतलेला आढावा.
31 डिसेंबर 2019 रोजी न्यूमोनिया सदृश्य नवीन प्रकारचा रुग्ण वूहान(चीन) येथे पहिल्यांदा आढळून आला. या विषानू चे नामकरण अद्याप झालेले न्हवते. 11 फेब्रुवारी 2020 रोजी who मार्फत covid-1 या नावाने या विषाणूची ओळख सुरू झाली.
या रोगसंदर्भात who ने 21 जानेवारी रोजी पहिला अहवाल सादर केला. तेव्हा चीनमध्ये 278 पेशंट या रोगाचे बाधित आहेत अस लक्षात आलं. यानंतर येथूनच हा रोग जगभर पसरला आहे. जगातील 95-96% देशांमध्ये हा रोग पसरला आहे. काही दिवसातील या रोगाचा प्रवास जाणून घेऊया.
पहिल्या अहवालात चीन (२७८), थायलंड(२), जपान(१) व कोरिया (१), पाचव्याच दिवशी चीन मधील हा आकडा १२९७ वर पोहचला. बाकी देशांमध्ये साधारण स्थिर वातावरण होत. दहाव्या दिवशी चीनमध्ये ७७३६ रुग्ण आढळले. तेव्हा भारतात पहिला रुग्ण आढळला तो दिवस म्हणजे ३० जानेवारी,२०२०. ०९ फेब्रुवारी रोजी ३७२५१ तर भारतात त्याच दिवशी फक्त ०३ पेशंट निदर्शनास आले. ०१ मार्च रोजी who चा अहवाल आला त्यात चीनने ८०००० चा आकडा पार केला होता. तर भारत स्थिर होता. बाकी देशांमध्येही याचा प्रसार होत होता. कोरियात ४३००, इटलीत १३६८ व इराणमध्ये ५९३ रुग्ण आढळून आले होते. ०३ मार्च रोजी भारतात ०५ रुग्ण, ०४ मार्च रोजी ०६, ०५ रोजी २९ रुग्ण आढळून आले. येथून कोरोनाने आपल्या देशात महाप्रवासाला सुरुवात केली. ०७ मार्च रोजी ३१ रुग्ण, १० मार्च ४४ रुग्ण व २० मार्च ला १९५ चा आकडा गाठला. कालच्या who च्या रिपोर्टनुसार ४५० चा आकडा पार झाला होता. २२व२३ मार्च च्या रिपोर्टनुसार २३८, ४१४ वर हा आकडा होता. आज(२५ मार्च) हा आकडा ५६२ वर पोहचला आहे (लिहीत असेपर्यंत).
चीन-८२१९५, इटली-८६६९२, अमेरिका-७३०९८,कोरिया- ९४२३,ज्या स्पेन मध्ये ३० जानेवारीला एकही पेशंट नव्हता जेव्हा भारतात पहिला पेशंट सापडला होता. तर त्या स्पेन ची स्थिती आता ६४७६६ वर गेली आहे. इराण ३१७९५ वर पोहचला आहे. जगामधील काही प्रमुख देशांचा आढावा घेतला तर त्यात, जर्मनी-४८०६८,ऑस्ट्रेलिया-३१७१व जपान-१४८३, ही आकडेवारी कोरोना बधितांची आहे. संशयित वेगळेच.
कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक असला तरी मात्र मृत्यूचा आकडा थोडा दिलासादायक आहे. सर्वात जास्त मृत्यूचे प्रमाण सकाळपर्यंत इटलीचा(८८२५) आहे. त्या पाठोपाठ , स्पेन (४७४४)त्या नंतर चीन (३३०५) या स्थितीत भारत(२१) हा आकडा मात्र चिंताजनक आहे. आकडा जरी कमी वाटत असला तरी येणाऱ्या काही दिवसात चिंता निर्माण करणारा ठरू शकतो. जगातील सर्व देशातील एकूण ५५५६४८ हे कोरोनाबाधित आहेत. तर मृत्यूची संख्या २५८३६ म्हणजेच ४.६४% प्रमाण आहे.
या इतर देशांची आकडेवारी पाहता आपण सुरक्षित आहोत असा गैरसमज करवून घेऊ नका. कारण प्रत्येक देशाची ही आकडेवारी ४००-५०० चा आकडा पार केल्यानंतर वाढली आहे. या आजाराने बाधित मृतांमध्ये इटली ज्याची लोकसंख्या ६.०५ करोड तो देश एक नंबर वर आहे. एवढ्या कमी लोकसंख्येच्या देशात मृत्यूचे प्रमाण जास्तीचे आहे, तर १३८ करोड लोकसंख्येवाला चीन बाधितांमध्ये एक नंबर वर व मृत्यूच्या प्रमाणात २ऱ्या स्थानावर आहे. तेथील आरोग्य व्यवस्था आपल्या देशाच्या व्यवस्थेपेक्षा सक्षम असताना सुद्धा. मग आपली काय स्थिती होईल याचा विचार करा.
हे गांभीर्य लक्षात घेऊन शासन,प्रशासन, आरोग्य विभाग आपल्यासाठी २४ तास सेवा देत आहेत. या सेवेला सहकार्य करणे ही भारतीय म्हणून प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. संपर्कातुन पसरणारा हा रोग आहे. आपण आप-आपसातील संपर्क बंद केला तर हा रोग पसरण्यास अडथळा निर्माण होईल व स्थिती सुधारण्यास मदत होईल. रविवारी२२ मार्च रोजी मा. पंतप्रधानांनी देशात जनता कर्फ्यु चे आवाहन केले होते सकाळी ०७:०० सायंकाळी ०९:०० पर्यंत. दरम्यान सायंकाळी ०५:०० वाजता सेवा देणाऱ्या सेवादात्यांचे आभार मानण्यासाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले. ते सुद्धा घराच्या गॅलरीत उभे राहून. पण आम्ही जथ्थे च्या जथ्थे रस्त्याने विक्षिप्त पद्धतीने सोंग करत, ढोल बडवत फिरत होतो. हा काय कोणता सोहळा होता का ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला होता. याचा उद्देश काय ?राजकीय विरोधकांना खिजवणे का आनंद व्यक्त करणे ? उद्देश कोणताही असो त्या दिवशी जे केलं त्यामुळे नक्कीच धोका निर्माण होऊ शकला असता. ज्या उद्देशाने प्रधानमंत्र्यांनी तो कर्फ्यु लागू केला होता. तो उद्देश पूर्ण बाजूलाच राहिला. या बेशिस्तीच्या स्वभावामुळे, गैरजीम्मेदार वागण्यामुळं पुढील २१ दिवस आता घरात बसण्याची वेळ तुमच्यावर आणि सर्वांवरच आलेली आहे. त्या दिवशी आपल्याला परिस्थितीचे नसलेलं गांभीर्य यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्याला कायद्याचाच धाक हवा असतो का ? पोलिसांच्या लाठीनेच तुम्ही ऐकणारे आहेत का ? माणूस म्हणून आपल्याला काही जबाबदारी पार पाडावी लागेल. याची भावना तुमच्या मनात येणार आहे का नाही ? तरुण वयातील या सळसळत्या रक्ताला योग्य ठिकाणी वापरणं गरजेचं आहे.
आपल्या अशा काही मूर्ख चुकांमुळे खूप लोकांना त्रास सहन करावा लागणार आहे. ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांचे काय होईल हा प्रश्न निर्माण होत आहे. तुम्ही सधन घरचे असाल किंवा मध्यमवर्गीय असाल तर तुम्हाला या २१ दिवसात कसलीही अडचण येणार नाही. फक्त तुम्हाला घरी बसण्याचा कंटाळा येईल.पण ज्यांनी आज कमावलं तरच त्यांना खायला भेटते अशांच काय ? ते या २१ दिवसात कसे जगतील ? यातून मी मा प्रधानमंत्र्याच्या निर्णयाचा विरोध करतोय अस समजू नका, तर ते निर्णय घेण्यास ज्याचं वर्तन जबाबदार ठरलं त्यांचा विरोध करतोय, त्यांना प्रश्न करतोय. तुम्ही जर निर्लज्जपणे वागले नसते. घरातच बसून राहिले असते, जमावबंदी दरम्यान प्रवास केला नसता, तर हा निर्णय घेण्याची वेळ प्रधानमंत्र्यावर आली नसती.
तुम्ही धडधाकट आहात तुमची रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे. म्हणून तुम्हाला बाहेर फिरण्याचा अधिकार कोणी दिला. तुमच्याकडे डोकं असेल तर एक मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या कोरोना बाधितांचा संपर्कात आलात. तो तुम्हाला झाला, तुमची प्रतिकारशक्ती चांगली आहे त्यामुळं त्यातून तुम्ही कोणाच्याही लक्षात न येता किंवा तुम्हा स्वतःलाही नकळता त्यातून तुम्ही त्यावर मात कराल. तुम्हाला चेकअप ची गरजसुद्धा पडणार नाही. पण तुमच्या संपर्कात आलेली बालके, वृद्ध यांना जर तुमच्यामार्फत अजाणतेपणी त्यांना जर लागण झाली तर त्यास कारणीभूत कोण ठरेल ? तुम्ही कारणीभूत आहात हे कोणाच्याही लक्षात येणार नाही पण यामुळे जे नुकसान होईल ते असह्य राहील. यासाठीच शासनाला कायद्याचा वापर करू तुम्हाला घरात बसवण्याची वेळ आली आहे. अंगातील ताकद या २१ दिवसात बाहेर येऊ देऊ नका. स्वतःवर विजय प्राप्त करण्याची ही मोठी संधी आहे.तुम्ही ठरवाल तर या २१ दिवसात तुम्ही तुमचे भविष्य घडवण्यासाठी काही चांगल्या सवयी लावून घेऊ शकता. अन्यथा एखाद्या कट्टयावर ग्रुप मध्ये बसून जे नको आहे ते सुद्धा घडवू शकता. संधी तुमच्या हातात आहे, या संधीच सोन करा. कोरोनापासून देशाला तर वाचवूयाच पण देशाला पुन्हा नव्या उर्जेसह विकसित करण्यात हातभार लावूया. एक ज्यांचे पोट हातावर आहे अशा तुमच्यापरिसरातील लोकांसाठी सुरक्षेच्या सर्व सोयींसह काही दान देता आले तर जरूर द्या. तेवढेच तुमचे सत्कार्य या काळात घडून येईल व समाधानाने हे दिवस जातील.
योग्य काळजी घेऊया आणि या संकटाला दूर पळवूया...
ReplyDelete