Thursday, May 7, 2020

सगळं कसं व्यवस्थित चाललंय ?

सगळं कसं व्यवस्थित चाललंय !



पाणी टंचाईची समस्या नाही,
उन्हाच्या ज्वाळांचा त्रास नाही,
पायाला चटके बसतायत अशी हाक नाही
सगळं कसं व्यवस्थित चाललंय
खरंच ! कोणालाच काही त्रास नाही ?


शेतकरी आत्महत्या नाही
हुंडाबळीची बातमी नाही
संपत्तीच्या वादातून भांडण नाही
सगळं कसं व्यवस्थित चाललंय
कोरोनाविन या देशात दुसरं
काहीच कस घडत नाही ?


बेरोजगार तरुण रस्त्यावर येत नाही
अतीकामाच्या तणावात कोणीही नाही
अभ्यासक्रमातील दोषांवर कोणीच बोलत नाही
सगळं कसं व्यवस्थित चाललंय
बेरोजगरीशी इथं कोणालाच
काही देणं-घेणं नाही ?



काय ?
व्यवस्थित नाही चाललंय !
जनता भुकेपायी मरतेय,
पाण्यापायी न भांडता शांत बसतेय,
रस्त्यांसाठी शिव्यांची लाखोली वाहतेय,
तरुण दिशाहीनतेमळं निद्रिस्त होतोय,
विद्यार्थी व्यवसायाविना निराश होतोय,
कामगार कामाविना हताश होतोय,
बेरोजगार रोजगाराच्या आशेने खचून जातोय,
गृहिणी कामाच्या तानाने हतबल होतेय,
वृद्ध गृहकालहामुळं चिंतेत पडतोय,
रुग्ण घरातील वातावरणामुळं चिडुन जातोय,
दानाच्या(घेणारा) नावाखाली येथे
सन्मान गहाण ठेवावा लागतोय,
सेवा देणाऱ्यांना पाठिंबा म्हणून
थाळी आणि मेणबत्तीच्या प्रयोग केला जातोय,
पण अपुऱ्या PPE किटबद्दल
आम्हाला काहीच नाही वाटतंय,
तरी आम्ही राजरोसपणे मिरवतय
सगळं कसं व्यवस्थित चाललंय...!
सगळं कसं व्यवस्थित चाललंय...!


सगळं कसं व्यवस्थित चाललंय अशी धूळ
तुमच्या डोळ्यात फेकली जातेय,
हे तुम्हाला सुद्धा खात्रीशिरपणे कळतेय,
मग कशाला कोणी तुमच्यासाठी
रस्त्यावर उतरण्याची वाट पाहताय ?
तुम्ही फसवले गेल्याच
जेव्हा तुम्हाला कळतंय,
तेव्हा जाब विचारण्याचा सर्वस्वी अधिकार
तुमचा असतो हे तुम्हाला का नाही कळतंय.
मग कशाला सहन करण्यात दिस घालवताय ?
प्रत्येकाने जाब विचारणं हे आपलं आद्य कर्तव्य बनंतय.
कुटुंबाच्या सुरक्षेच्या नावाखाली किती पिढ्या शांत बसवताय
त्याचाच गैरफायदा घेत येथे प्रत्येकजण
लुटमारीचा धंदा करतंय.....

4 comments:

  1. Nice
    पण सद्या पूर्ण जग जगणं आणि मरणं यातील अंतर मोजत आहे मग जेव्हा जेव्हा मरणाचा प्रश्न आला तेव्हा मानवाच दुःख हे नाहीस होत मग ते कोणते असो.
    एक म्हण आहे.जितेंगे तो और लढगे.

    ReplyDelete
    Replies
    1. अयोग्य नियोजनाअभावी निर्माण झालेली ही स्थिती आहे. कालचे आरोग्य विभागाचे स्टेटमेंट आहे. कोरोनासह आम्हाला जगायला शिकावे लागणार आहे....

      म्हणजे नेमकं काय सांगायचंय शासनाला ? हे सामान्यांनी समजून घ्यायला हवं...

      Delete
    2. Thnx......लिहित राहण्याचा प्रयत्न....आपली साथ राहुद्या...

      Delete

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...