लॉकडाऊन मूळ भरलीय धडकी
हातावर पोट आहे मणून नाय ओ सायब
पोराचं नेमकं शिकण्याच वय
त्यात एक वर्ष वाया गेल म्हणून,
छातीत धड-धडायला लागलंय ओ सायब
म्हणून प्रश्न दोन वेळच्या जेवणाचा नाय ओ सायब
एक वर्षाचा विचार करून
तुम्ही त्यावर उपाय काढला
मुलाला नापास न करता
तुम्हीं पुढच्या यत्तेत धाडलं त्याला
पण त्या एक वर्षात हिरावून घेतलेल्या
मूलभूत हक्काचं काय ओ सायब,
त्या एक वर्षात कोवळ्या मनावर
भविष्याचं बीज पेरलं जाणार होत सायब
त्या कोवळ्या मनावर ना रुजलेल्या
बियाचा विचार येतो हो सायब
म्हणून लॉकडाऊन ची धडकी भरते ओ सायब.
चांगलं वर्गात पहिला येणार आमचं प्वार
आज उनाडक्या करत गावभर हिंडतंय ओ सायब
ए,बी,सी,डी वन टू ते जे काय म्हणता ते
बिना शिकवणी घडा-घडा
बोलून दावणार माझं प्वार
आता तसलं काही विचारताच गप्प-गुमान
मान खाली घालतंय ओ सायब
म्हणून प्रश्न दोन वेळच्या जेवणाचा नाय ओ सायब.
मास्तराला प्यार होत माझं लेकरू
नेहमी कौतुक असायच
सगळ्यांच्या तोंडी गुणांच लेकरू,
आता त्यातले सगळे गुण बदलून गेलेत ओ सायब
काल शालिनतेने वागणार माझं प्वार
आज शिव्यांची लाखोली वाहतंय ओ सायब
हे सर्व पाहून त्याच्या भविष्याची चिंता सतावतेय ओ सायब
म्हणून तुमच्या लॉकडाऊन ची भीती वाटतेय
प्रश्न दोन वेळच्या जेवणाचा नाय ओ सायब
वयात आलेलं प्वार हताश निराश होऊन
डोळ्यासमोर मान खाली घालुन बसतंय ओ सायब
दोन वर्षे झालं तुमची नोकरभरती नाही,
घोटाळे बंद व्हायचं नाव घेत नाही,
आम्ही तरी त्याला किती आणि
कसा धीर द्यायचं सायब ?
नोकरीविना, बेरोजगरीमुळं पोराचं लग्न जुळत नाही,
लेकीला नौकरी लागलं म्हणून
लग्नापासून दूर ठेवले तिला.
शिक्षणाच्या प्रवाहात आणून तिला
आम्ही काय खूप मोठा गुन्हा केला ?
आता नोकरी नाही, नोकरिवाले मूल भेटत नाही
यात आमचं कुठं काय चुकलं ?
हे जाणून घेऊन तुम्हीच सांगा सायब
आम्ही सामान्यांना कसे दिस काढायचं सायाब ?
हि परिस्थिती पाहता भीती वाटते आम्हा त्या तुमच्या लॉकडाऊन ची
भ्रांत नाही ओ सायब आम्हा
आमच्या दोन वेळच्या जेवणाची.
हि इथली जनता म्हणजेच देश ना ओ सायब
मग जनतेचीच अधोगती असेल,
जनतेचाच विकास नसेल,
जनताच निराश आणि हताश असेल,
जनताच वाऱ्यावर असेल ,
तर देशाचा विकास कसा होईल सायब
देश आणि देशातील प्रत्येक घटकांची
काळजी लागून राह्यली
म्हणून तुमच्या लॉकडाऊन ची भीती सायब
आम्हा दोन वेळच्या जेवणाची मुळीच भ्रांत नाही वो सायब।
©जी.संदीप (गोणार,नांदेड)
📱 9552803980
वास्तववादी लेखन🙏🙏
ReplyDeleteसलाम तुमच्या सडेतोड प्रश्नाला
ReplyDeleteMastt Bhau
ReplyDeleteNice sir
ReplyDelete