Friday, July 7, 2023

Convacation फॉर्म (डिग्री फॉर्म) कसा भरावा.

 

विविध प्रश्नांसाठी ही उपयुक्त माहिती...

तो ऑफलाइन भरावा का ?
फॉर्म कसा भरावा ?
कागदपत्रे काय लागतील ?
प्रमाणपत्र ऑनलाइन भेटेल का ऑफलाइन ?
या विविध प्रश्नांसाठी स्लाईड सह माहिती देत ​​आहे...

पदवीप्रमानपत्रासाठी विद्यापीठाने पुरविलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन फॉर्म भरावा. 
प्रमाणपत्र ही विद्यापीठात, महाविद्यालयात किंवा पोस्टाद्वारे तुम्हाला प्राप्त करून घेता येईल. 



ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठीची पद्धत खालीलप्रमाणे....



डिग्री फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या srtmun.ac.in या लिंकद्वारे  होम पेजवरील परीक्षा विभागावर क्लिक करावे. त्यानंतर परीक्षा दीक्षांत कक्ष (Convacation Section) या पर्यायावर क्लिक करावे. 



दीक्षांत कक्षावर क्लिक केल्यानंतर येणाऱ्या पहिल्या पर्यायावर क्लिक करावे.


त्यानंतर फॉर्म भरण्यासाठीची खालील लिंक दिसेल त्यावर क्लिक करावे.   

त्यानंतर स्क्रीन वर create New Account असा पर्याय स्क्रीन वर दिसेल त्यावर क्लिक करावे.





रजिस्ट्रेशन साठी माहिती मागणारे पेज स्क्रीन वर दिसेल त्यात 
01) तुमचा ई-मेल टाइप करावा (हाच नंतर तुमचा आयडी म्हणून वापरण्यात येतो. )
02) पासवर्ड टाइप करावा (हा नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी असतो. त्यामुळ मला पासवर्ड माहीत नाही कोणता आहे की, आस समजून गोंधळून जावू नये. तुम्हाला हवा असलेला पासवर्ड तुम्ही टाइप करू शकता.)
03) शेवटच्या सेमिस्टर वरील (सहावे सेमिस्टर) सीट नंबर टाकावा 
त्यानंतर सबमीट करावे. 
आशा पद्धतीने पदवी प्रमानपत्रासाठीचे तुमचे रजिस्ट्रेशन होईल.


त्यानंतर लॉगिन चा पर्याय स्क्रीन वर दिसेल. त्यात रजिस्ट्रेशन करतेवळी टाकलेला ई मेल आणि तुम्ही टाइप केलेला पासवर्ड टाइप करून लॉगिन वर क्लिक करावे. 



लॉगिन केल्यानंतर स्क्रीन वर तुमचा शेवटच्या सेमिस्टर चा सीट नंबर दिसेल. स्क्रीन वर खालच्या बाजूने edit चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून पुढील माहिती भरावी लागेल.





convacation form चा पर्याय निवडत असताना तीन पर्याय येतील 
01) Convacation 26 th (हा पर्याय निवडलात तर तुम्हाला विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्र स्वीकारता येईल. यासाठी 510 रुपये फिस आकरण्यात आली आहे. )
02) Preseintia (महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या पदवीदान समारंभात तुम्हाला पदवी स्वीकारता येईल.यासाठी 180 रुपये फिस आकरण्यात आली आहे.)
03) Absentia (पोस्ट द्वारे पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी, या पर्यायासाठी पोस्ट टपाल खर्चाचा अतिरिक्त चार्ज लागेल. यासाठी विद्यापीठात जाऊन फिस भरावी लागेल.)



इतर सर्व माहिती भ्रूण घ्यावी त्यात 
01) उत्तीर्ण झालेला कोर्स 
02) उत्तीर्ण झालेले वर्ष 
03) ग्रेड
04) रिझल्ट 
05) शेवटच्या सेमिस्टर चा बैठक क्रमांक.
06) महाविद्यालयाचे नाव (कॉलेज कोड ) 
07) ईलीजीबीटी नंबर (हा तुमच्या मार्कमेमो वर असतो)
08)मोबाइल नंबर 
09) ई-मेल आय डी 
10) पूर्ण नाव (मार्क मेमो वर जसे आहे तसेच)
11) (optional च्या ठिकाणी Optional विषयची नोंद करावी.
12) पूर्ण पत्ता (पोस्टाने हवे असल्यास अचूक पत्ता टाकावा)
त्यानंतर save या पर्यायावर क्लिक करावे.  



त्यानंतर photo या पर्यायावर क्लिक करून फोटो आपलोड करावा.(फोटो आपलोड करत असताना फोटोचे background पांढऱ्या कलरचे असेल याची खबरदारी घ्यावी. तोच फोटो Degree Certificate वर प्रिंट होऊन येत असतो.) 





फोटो निवडून save या पर्यायावर क्लिक करावे. 
अपलोड केलेली फोटो स्क्रीनवर दिसत असेल तर home या पर्यायावर क्लिक करावे.
त्यानंतर स्क्रीन वर प्रिंट या पर्यायावर क्लिक करून प्रिंट काढून योग्य त्या फिस सह सर्व वर्षाचे मार्कमेमो झेरॉक्स, ऑनलाईन अपलोड केलेली पासपोर्ट फोटो सह फॉर्म महाविद्यालयात किंवा विद्यापीठात जमा करावा.





धन्यवाद. 

1 comment:

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...