15 ऑगस्ट ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं
पण तरीसुद्धा आनंदी नव्हतो आम्ही
म्हणून प्रजासत्ताकाचा सोहळा
धूमधडाक्यात साजरा करतो आम्ही
पण तरीही प्रजासत्ताकाची मुहूर्तमेढ आहे
15 ऑगस्ट याच दिनी
म्हणून उत्साह संचारतो
काही भारतीयांच्या अंगी
स्वातंत्र्याचा महिना संपला
देशभक्तीचे गुणगान गाणे बंद करू
दुसऱ्या पेक्षा माझाच जास्तीत जास्त कसा फायदा होईल
हे पाहणे आम्ही कसे विसरू
भारत देश म्हणजे दक्षिणेच्या टोकापासून
उत्तरेच्या टोकामधील भौगोलिक परिसर होय
त्यातील जिवंत माणसे देश या संकल्पनेत
समाविष्ट करण हे चुकीचं होय
म्हणून या देशात पहिल्यांदा
माझी प्रत्येक हौस पूर्ण झाली पाहिजे
इतर नागरिक मेले तरी मला काय पर्वा
माझी हौस पूर्ण करून घेणे हेच ध्येय असल पाहिजे.
मीच जिवंत नसलं, माझीच सप्न पूर्ण होत नसतील
तर देशाबद्दलच्या अभिमानाच काय लोणचं घालायचं काय ?
माझाच इथ विकास नसल तर
दुसरा प्रत्येक जन भकास झाला तरी त्याचं मला काय ?
अशीच मानसिकता इथ
करोडोंच्या मनात रुजलेली दिसतेय
म्हणून जो तो कस लुबडता येईल देशाला
हेच विचार करत जगताना दिसतोय
स्वातंत्र्य दिनी मात्र झेंड्याखाली शासक प्रशासक
पांढऱ्या कपड्यात काळी मानसिकता घेऊन मिरवतोय
खरा झेंडा मात्र सामान्यांच्या हृदयात
मलीन कपड्याचा सल्यूट घेत फडकतोय
कशाचा स्वातंत्र्य दीन
आणि कशाच आलंय स्वातंत्र्य
इंग्रज निघून गेले कायमचे पण
दिडशहाने हलवत आहेत देशाचं सूत्र
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे
हे सांगत फिरतात काही जण
शासक प्रशासक म्हणजे आहेत नोकर
हे सुद्धा जाणून घ्यावं प्रत्येक जण
म्हणून मित्रांनो आपणही देशाला लुबाडूया
पण त्याआधी थोडीशी गुंतवणूक करूया
निसर्ग संवर्धनासाठी झाडे लावूया,
गरजा मर्यादीत ठेवूया,
दुसऱ्याला आपल्या जगण्यातील रुबाब दाखवणे टाळूया
गरजेएवढेच प्रत्येक गोष्ट मिळवत राहूया,
प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळेल यासाठी प्रयत्न करुया
देश ओस पडूद्या आपल्याला त्याच काय देणं-घेणं
जे सोबत आहेत त्याच्यासाठी मात्र आपण नेहमी पुढं येऊया.
देशाचं वाटोळं होऊद्या
आपल्याला काय देणं घेणं
आपण मात्र आपल्या परिसराला
उत्तम आणि पोषक असे बनवूया
आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे
त्या गोष्टींची निर्मिती आपणच करुया
देशावर आक्रमणे झाली तर होऊद्या
आपल काय जातंय त्यात
आपण फक्त आपल्या शेजाऱ्यांसोबत
परिसरातल्यांसोबत एकात्मतेने राहूया
जात धर्म पंथ यामुळं देशात होत राहूद्या वाद विवाद
आपण फक्त हिंदू, मुस्लिम, बौध्द, शीख, इसाई, ख्रिश्चन
अशा वेग वेगळ्या जाती धर्माचे एकत्रित शेजारी शेजारी राहूया
रोटीच नात एक मेकांशी ठेवून आनंदाने इथ जगूया
बेटीच्या व्यवहाराच बघुया नंतर कधीतरी
आधी रोटीच्या व्यवहाराच नक्की करून घेऊया
मग काय घेणं देणं देशाचं आम्हाला या
आम्ही सुखाने नांदू लागल्यानंतर
जात धर्माच्या नावावर लढणाऱ्याना लढत राहू द्या....
स्वातंत्र्याचा महिना संपत असताना
आम्ही स्वातंत्र्य आहोत का हे बघुया
नसल आम्हाला स्वातंत्र्य तर सर्वजण मिळून
एकत्रितपणे स्वातंत्र्य जगत राहूया....
मानसाशी मानसासारखे वागुया..........
© जी.संदीप (गोणार,नांदेड)
9552803980

👍👌💯🔥
ReplyDeleteखरच खुप छान सर खर स्वातंत्र्य हे प्रजासत्ताक दिवशी मिळाल.
ReplyDeleteखुप सुंदर 👍
नेहमीसारखीच विचार करायला भाग पाडणारी कविता...
ReplyDeleteभारतीय समाजाची खरी परिस्थिती विषय आपले विचार कविते मध्ये माडलात खूप छान सर
ReplyDeleteIt's reality!! which you written in this.
ReplyDeleteखूपच छान👍
ReplyDelete