आम्ही फक्त गुन्हा घडला की,
त्यावर हळहळ व्यक्त करतो.
तो का घडला, कोणी घडवला
याकडे मात्र कानाडोळा करतो.
पुलवामा घडला, अथवा असो घडवला गेला ?
पण त्यात मारले गेले आमचे सैनिक
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहने
एवढेच शिल्लक आहे का आमचे कर्तव्य नैतिक ?
त्यांच्या नावाने प्रेम दिनाच्या दिवशीच
काळा दिन साजरा केला जातो
अशा प्रतीद्वंदी दिवस साजरा करण्याने
फक्त द्वेशच मनात साठवला जातो.
नसेल साजरा करायचा प्रेम दिन
नका करू कोण तुम्हाला सक्ती केलंय ?
पण सैनिकांच्या नावाखाली
काळा दिन साजरा करण्याने काय प्राप्त केलंय ?
प्रत्येक वर्षी काळा दिन साजरा करून
सैनिकांसाठी काही हासिल झालंय का ?
काळा दिनाचा हट्ट सोडून दोषींना सजा देण्याचा विचार
कधीच डोक्यात येत नाही तुमच्या, अस का ?
सैनिकांच्या जीवांचा खरचं कळवळा आहे की
फक्त एक दिवसाची सहानुभूती दाखवायची ?
पारंपरिक संस्कृतीच्या नावाखाली,
घडत असलेल्या प्रसंगात आपली दंडेलशाही पुढं आणायची ?
ज्यांच्या बळावर हे असले थेर तुम्ही करताय
त्यांना एकदा विचारून बघा.
त्या रोड वर तेवढा शस्त्रसाठा आला कसा ?
नाही मिळणार उत्तर, पण त्यांच्या तोंडावरचे भाव नक्की बघा
मग तुम्ही समजून घ्या की,
काळा दिन किती दिवस साजरा करायचा ?
उगाच एखाद्या बाबीला विरोध करण्यासाठी,
निरर्थक का आग्रह धरायचा ?
अरे तुम्ही या दिनाला विरोध करण्याचं कारण हे तर नाही ना,
तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रियशी न असणे ?
असल काही असल तर सावरा जरा स्वतःला.
आयुष्यात प्रेमाविना काहीही टिकन अशक्य आहे,
हे समजावून सांगा मेंदू आणि मनाला.
हा प्रेम व्यक्त करण्यात त्यांचं चुकत असेल खूप काही,
म्हणून काय मग त्या दिनाला विरोध करायचा का ?
एवढाच तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला आवडत नसेल
तर अन्य मार्गाचा वापर करायचा ना ?
© जी.संदीप (गोणार,नांदेड)
9552803980
%20(11).jpeg)
%20(12).jpeg)
👍👍
ReplyDeleteThnk you so much ❤️
Deleteपरिस्थिती सापेक्ष कविता लिहिली आहे सर.. खुप छान अभिनंदन आणि असंच निर्भिड पणे प्रत्येक विषयावर व्यक्त होत रहा करिता शुभेच्छा 💐💐
ReplyDeleteThnk you so much sir ❤️
Deleteकाही अंधभक्ताना माहित नसते तरी पण म्हणतात हा काळा दिवस म्हणुन त्यांना काय माहित आहे ज्या कोणामुळे आपल्या सैनिकाचे प्राण गमावले कसा आला RDS कुठून आला कोणी आणला हे शोधायला पाहिजे ना उगाच कोनी म्हणेल त्यावर विश्वास ठेवतात अष्यामुळेच ते अंधभक्त ठरतात त्यांना जाणून घ्यायचं वाटत नाही थोड डोकं तरी कधी तरी चालवत नाहीत उगाच ये मेरा ओ मेरा अस म्हणतात स्वतःच्या बापाला कधी नीट पने बाप म्हणतं नाहित दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणाऱ्या आवलादी असतात अंधभक्तानो विचार करा का घडलं असेल कोणा मुळे घडलं असेल त्या मुळे जर तुम्हाला थोडीशी जर आपल्या भारतीय जवानांची पर्वा वाटत असेल तर त्याच्या शोध घ्या ज्यानी हा कट रचला होता त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पण अशे कारण लाऊन कोणत्याही प्रेम करणाऱ्या जोडप्यांना उगाच त्रास देऊ नका
Deleteबघा विचार करा पटते का बघा तुमच्या विवेक वादी बुद्धीला
अतिशय वास्तव परीस्थिती सांगितली आहे सर आपण खुप सुंदर ❤️
ReplyDeleteThnk you so much ❤️
Delete