लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभअसलेल्या पत्रकारितेत एका चॅनल च नाव जनसामान्य हक्काने घेत होते. त्यातील एक आवाज होता रविश कुमार जो सत्ताधाऱ्यांच्या नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारत होता ? वास्तव काय ते नागरिकांच्या नजरेत आणून देण्याचा प्रयत्न करत होता. हाच आवाज सत्ताधाऱ्यांना बंद करायचा होता. पण तो बंद करणार कसा ? त्याला विकत तर घेऊ शकत नाही जस अन्य पत्रकारांना विकत घेऊ शकतो. त्याने आपला भाव कोणाला करूच दिला नाही कधी. मग त्याचा आवाज बंद कसा करायचा ? मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यावर एक शक्कल लढवली आणि त्या चॅनल मधील शेयर चा भाग विकत घेतला आणि तो आवाज दाबण्याचा अधिकचा समभाग विकत घेऊन तो प्रयत्न केला. पण तरी सुद्धा रवीश चा आवाज दबायला तयार नव्हता. त्या आवाजावर एव्हढा दबाव आला की, तो आवाज घुटमत राहिला. मग अशा सर्व परिस्थितीत त्या आवाजानेच निर्णय घेतला की, इथ घुटमत राहण्यापेक्षा दूर होण योग्य समजून शेवटी त्यांनी राजीनामा दिला. सत्ताधाऱ्यांचा मानस पूर्ण झाला.
या घटनेमुळे काही जणांना खूप आनंद होतोय, जनसामान्यांचा आवाज दाबल्या गेला आणि सत्ताधाऱ्यांच्या गोष्टीला विरोध करणारा आवाज संपला. पण हा आवाज सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होता म्हणजे विरोधकांच्या सर्थनर्थ होता का ? हा आवाज संवैधानिक कामाच्या विरोधात होता का ? हा आवाज लोकशाहीच्या विरोधात होता का ? हा आवाज उथळपणे निर्माण झालेला होता का ? या सगळ्यांचा विचार एकदा आपण करून पहावा.
हा आवाज सामान्य नागरिकांच्या हितासाठी होता ना ? मग हा आवाज सामान्य नागरिकांच्या हितासाठी होता तर त्या आवाजाच्या समर्थनार्थ आपल्याला उभे रहावे लागेल. कारण मागील काही वर्षापासून मीडियाच्या बाबतीत विचार केला तर नवीन चॅनल ला परवनगी नाही. जरी परवानगी दिली तरी ती स्वतंत्रपणे चालणारे चॅनल नाही. जे चॅनल सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यानुसार काम करतात त्या चॅनल ला सहकार्य केलं जातं. अन्य चॅनल वर बंदी आणली जाते किंवा त्यावर हवी तशी कार्यवाही केली जाते. अन्यथा जाहिरातींचा पुरवठा खंडित केला जातो मग त्या शासकीय असो अथवा खाजगी. अशावेळी ते चॅनल लवकरच बंद पडते आणि सत्ताधाऱ्यांचे मनसुबे साध्य होतात. अशावेळी नागरिक म्हणून आपल्याला आपली भूमिका कठोरपणे पार पाडावी लागणार आहे. जे चॅनल तुमच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार नाही त्या चॅनल चा TRP वाढवून त्याला समर्थन देण्याऐवजी ते चॅनल पाहणे बंद करावेत. काही चॅनल तळवे चाटण्याच काम करत 24 तास लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून नाही तर एखाद्याची रखेल बनून प्रसारण करत असते. असे चॅनल डीटीएच च्या माध्यमातून फ्री मध्ये पुरवले जातात. आपण पैशाची चिंता करून ते फ्री चे चॅनल पाहत राहतो आणि त्या चॅनल वाल्यांचे खिसे भरतो. यातून सामान्य नागरिकांसाठी आवाज वाढवणारे चॅनल आर्थिक पाठबळ नसल्यामुळ बंद पडतात आणि सुरू होतो दर्जाहीन पत्रकारितेचा प्रवास.
दर्जाहीन पत्रकारितेला रोखायच असेल दलाल आणि बिकावू मीडिया तयार होऊ नये अस वाटत असेल सामान्यांच्या आवाज होऊ पाहत असलेल्या प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक संघर्षात साथ देणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे हे असे राजीनामा सत्र थांबेल अन्यथा हे चालतच राहील.
© जी.संदीप (गोणार,नांदेड)
9552803980

No comments:
Post a Comment