स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना या, स्वातंत्र्याच्या समता,स्वातंत्र्य आणि बंधुता हा गुण आपल्यात असावा. हे गुण जर आमच्यात रुजनार नसतील तर, स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. जर ते गुण प्रत्येक भारतीयांच्या अंगी भिनतील तर, आम्हाला कोणाकडूनही संरक्षण करून घेण्याची गरज नाही.
वास्तव पाहिले तर असे निदर्शनास येते की, आमच्यामध्ये स्वातंत्र्याची बीजे रुजण्यास खूप कालावधी लागेल असे दिसते कारण, एक-मेकांबद्दल जर समतेची भावना नाही, आप-आपसात बंधुता नाही असे असेल तर, आजसुद्धा स्वतःच्या संरक्षणासाठी बहिणीला भावाकडे राखी बांधून संरक्षणाची अप्रत्यक्ष मागणी करावी लागेल जर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात ही स्थिती असेल तर कसे चालेल ?
आज च्या युगात आम्हा सर्वांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. मग या पोलीस प्रशासनाला भारतीय नागरिक (फक्त स्त्री नाही) राखी का बांधत नाही ? मला व्यवस्थेच्या कोणत्याही गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात स्वारस्य नाही.पण मनात आलेला प्रश्न उपस्थित करणं आणि व्यवस्थेच्या शिलेदारांना त्याचा जाब विचारणं हा स्वातंत्र्याचा भाग आहे.
पण आपल्या मताच्या विरोधात किंवा आपल्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्याला विचाराच्या आधारे प्रत्युत्तर न देता. त्याचं व्यक्त होन बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशा स्वातंत्र्याला आम्ही कस स्वीकारायचं ? तुमच्या या अशा दुतोंडी स्वातंत्र्याचा धिक्कार करतो. लाथ मारतो तुमच्या अशा स्वातंत्र्य सोहळ्याला...सोहळा साजरा करण्याने कोणी स्वातंत्र्य होत नसते. इंग्रजांनी आपल्यावरील सत्ता सोडली म्हणून काय झालं ? जिथं एखाद्याला गुलामीत ठेऊन राजा बनण्याची ज्यांची विचारसरणी आहे. अशांसोबत हा स्वातंत्र्याचा सोहळा कितीही पिढ्यांनी साजरा केला तरी, या स्वातंत्र्य दिनाचा काहीही फायदा होणार नाही. हे का लक्षात येत नाही.स्वातंत्र्य हे कायद्याने नाही तर प्रत्येकाच्या मनाने उपभोगता व देता आलं पाहिजे. तेव्हा कुठं या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होतो...मग त्या स्वातंत्र्यात कोणत्याही बहिणीला कोणाकडून संरक्षणासाठी आपल्या भावाला राखी बांधायची गरज पडणार नाही. राखी बांधून घ्यावी लागते म्हणजे संरक्षणाची मागणी आली. संरक्षण आले म्हणजे कोणी एक दुबळा झाला. दुबळेपन आले म्हणजेच समता नाकारण्याची सुरुवात झाली. जिथे स्वातंत्र्य नसते तिथे तुम्हाला काय खाक स्वातंत्र्य मिळेल. मग जिथे स्वातंत्र्य नाही तिथे स्वातंत्र्य दिन कसाही साजरा केला तर काय फरक पडतो. कोणतेही सोहळे साजरे केल्याने आमचा विकास होणार नाही. आमच्या विकासासाठी विचारातील सम्यक परिवर्तन आणि मी एक माणूस म्हणून माणसाशी कसे वागावे या भावनेने राहिलो तर आम्हाला काहिही अडचणी येणार नाहीत.
तिकडे ज्या गुरुजीला आदर्श मानता तो गुरुजी राष्ट्रध्वज अमान्य करतो, मी राष्ट्रगीत सुद्धा म्हणणार नाही, राष्ट्रध्वज फडकविणार नाही असे जाहीर पने सांगतो, त्याचेच शिष्य तुम्ही सत्तेत असताना राष्ट्रध्वज प्रत्येकाच्या घरावर सन्मानाने फडकवण्याचा आदेश देता. एवढीच देशभक्ती रुजवायची आहे तर मग त्या तुमच्या गुरुजींच्या डोक्यात जरा घुसवा ना. मग सामान्य नागरिकांच्या मनाचा विचार करा.
तसंही सामान्य नागरिकांच्या देशप्रेमाबद्दल बोलण्याची तुमची लायकीच नाही. देशातील प्रत्येक क्षेत्रात अयोग्य गोष्टी घडवून आणून देशाचं वाटोळं करण्यात गुंग असणारे तुम्ही, तुमची काय लायकी आहे सामान्य नागरिकांच्या मनात देशभक्ती रुजवण्याची. एक किस्सा सर्वपरिचित आहे तो असा की, गांधिजीकडे एक महिला आपल्या मुलाला असलेली गूळ खाण्याची सवय सोडवण्यासाठी आल्यानंतर गांधीजींची वागणूक आणि दिलेला सल्ला. साधं व्यसन सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला त्याच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी आधी स्वतः निर्व्यसनी बनले. मग तुम्हाला नागरिकांच्या मनात देशभक्ती रुजवयचीच आहे तर मग आधी स्वतः मध्ये देशभक्ती रुजली आहे का हे कधी पाहाल ?
धर्म आणि जातीच्या नावावर तंटे निर्माण करणारे तुम्ही, शासकीय कामात गैरव्यवहार करून मलिदा जमा करणारे तुम्ही, तुमच्या त्याच चुकीच्या कामामुळे शेकडो आणि हजारो जीव गेले तरी तुम्हाला फरक नाही पडत मग तुम्हाला नागरिकांच्या मनात देशभक्ती रुजविण्याचा काय अधिकार ?
अशा या सर्व चुकीच्या वागणुकीला फाटा देण्यासाठी प्रतीके पुढे करून देशभक्तीच ढोंग रचल्याने देश सर्वांगीण विकसित होणार नाही. मी जे करत आहे ते योग्य आहे. अधीच्यानी काहीच केलं नाही असा डांगोरा पिटून स्वतः किती चांगले आहोत हे सिद्ध करण्याचा सगळा आटापिटा का आणि कशासाठी ?
प्रतिकांतील देशभक्ती पुढे येत असताना त्या प्रतीकांचा होत असलेला गैरवापर याबद्दल कोणीही काहीही चकार शब्द काढायला तयार नसतील तर त्या देशभक्तीचा हा तमाशा किती दिवस करणार ?
मनात द्वेषभावना ठेवून, जीवित संपत्तीचा विचार न करता प्रतिकांद्वारे देशप्रेम दाखवून, आपण देशाचा कोणता विकास करू शकतो का ? याचा विचार व्हावा त्या विचारातून आजच्या दिवसाची सुरुवात करूयात व एकमेकांशी प्रेमाने वागून आपलं आयुष्य सुखकर व आनंदी बनवूयात. आपल्या सर्वांना या बंदीस्त स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐💐💐💐💐💐💐💐
@ जी.संदीप
9552803980

👍
ReplyDelete💯👌👍
ReplyDelete💯✌️
ReplyDelete🙏👌👌
ReplyDelete👏
ReplyDelete👍👌👌
ReplyDelete100% बरोबर आहे. खरच खुप छान सर 🙏
ReplyDelete👌👌
ReplyDelete🙏🙏🙏🙏
ReplyDeleteVery nice sir 👍👌
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDelete👍
ReplyDelete