Sunday, September 3, 2023

ABC id

 काय आहे ABC I'd आणि ती कशी काढायची ?



       पुढील वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये गुण आणि ग्रेड पद्धत बंद होऊन क्रेडिट पद्धत लागू करण्यात येणार आहे. तुम्ही कोणत्याही फील्ड चे जर शिक्षण घेत असाल तर त्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे. ABC I'd(Academic Credit Bank) म्हणजे एकप्रकारे बँकेतील खात्याप्रमाने तुमचे शैक्षणिक क्षेत्रातील खाते होय. बँकेत जसे तुम्ही पैसे जमा केल्यानंतर ते तुमच्या खात्यात जमा राहतात. तसचं तुम्ही जस शिक्षण घेत रहाल त्या पद्धतीने तुमच्या शैक्षणिक खात्यात तुमचं क्रेडिट जमा होत राहणार आहे.      

         त्यासाठी ABC I'd ही अत्यंत आवश्यक आहे. याची दखल घेऊन विद्यार्थ्यांनी आपली ABC I'd तयार करून घ्यावी.


ABC I'd काढण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर पुढील प्रक्रिया करावी.


https://www.abc.gov.in/

त्यानंतर विविध वेबसाईट च एक पेज तुमच्या समोर ओपन होईल. त्यातील पहिली वेबसाईट ओपन करावे.




त्यानंतर my account हा पर्याय उजव्या बाजूला कोपऱ्यात दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर students आणि university यापैकी students या पर्यायावर क्लिक करावे.


त्यानंतर त्यात mobile no टाकावा त्यावर एक OTP येईल तो OTP टाकून verify वर क्लिक करावे.



पुढील पेज ओपन होईल.

त्खलील (आवश्यक ती सर्व माहिती भरावी)

 पूर्ण नाव ------

जन्म दिनांक -----

gender ------

एक युजर नेम टाईप करावा (हा नवीन युजर नेम तयार करायचा असतो.)------

त्यानंतर pin जो ठेवायचा असेल तो pin टाईप करावा ---------- 

तोच  पिन पुन्हा टाकावा --------

dialogue box la click (त्याखाली असलेला चौकोन) करून

verify वर क्लिक करावे. 


त्यानंतर आधार kyc साठी च पेज ओपन होईल

त्यात आधार नंबर टाकावा 

त्यानंतर येणारा OTP टाकून सबमिट करावा.


त्यानंतर ईमेल साठी पेज ओपन होईल त्यात ईमेल टाईप  करावा आणि verify वर क्लिक करावे.



त्यानंतर मेल ला OTP येईल तो OTP टाकून सबमिट करावे.

त्यानंतर जे पेज ओपन होईल त्यात

विद्यापीठाचे नाव मद्ये (Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded) निवडावे

Admission year या वर्षी ज्यांचे झाले आहे त्यांनी 2023 निवडणे (अन्य विद्यार्थ्यांनी आप आपला प्रथम वर्षाचे प्रवेश वर्ष टाकावे.)

Identity type :- (योग्य ते निवडून sabmit करावे.

त्यानंतर abc I'd तयार झाल्याची स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल. 


त्याची प्रिंट काढून महाविद्यालयात सबमिट करावे.


Wednesday, August 30, 2023

...आणि स्वातंत्र्याचा महिना संपला




15 ऑगस्ट ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं

पण तरीसुद्धा आनंदी नव्हतो आम्ही

म्हणून प्रजासत्ताकाचा सोहळा

धूमधडाक्यात साजरा करतो आम्ही


पण तरीही प्रजासत्ताकाची मुहूर्तमेढ आहे

15 ऑगस्ट याच दिनी

म्हणून उत्साह संचारतो

काही भारतीयांच्या अंगी


स्वातंत्र्याचा महिना संपला

देशभक्तीचे गुणगान गाणे बंद करू

दुसऱ्या पेक्षा माझाच जास्तीत जास्त कसा फायदा होईल

हे पाहणे आम्ही कसे विसरू


भारत देश म्हणजे दक्षिणेच्या टोकापासून

उत्तरेच्या टोकामधील भौगोलिक परिसर होय

त्यातील जिवंत माणसे देश या संकल्पनेत

समाविष्ट करण हे चुकीचं होय


म्हणून या देशात पहिल्यांदा

माझी प्रत्येक हौस पूर्ण झाली पाहिजे

इतर नागरिक मेले तरी मला काय पर्वा

माझी हौस पूर्ण करून घेणे हेच ध्येय असल पाहिजे.


मीच जिवंत नसलं, माझीच सप्न पूर्ण होत नसतील

तर देशाबद्दलच्या अभिमानाच काय लोणचं घालायचं काय ?

माझाच इथ विकास नसल तर

दुसरा प्रत्येक जन भकास झाला तरी त्याचं मला काय ?


अशीच मानसिकता इथ

करोडोंच्या मनात रुजलेली दिसतेय

म्हणून जो तो कस लुबडता येईल देशाला

हेच विचार करत जगताना दिसतोय


स्वातंत्र्य दिनी मात्र झेंड्याखाली शासक प्रशासक

पांढऱ्या कपड्यात काळी मानसिकता घेऊन मिरवतोय

खरा झेंडा मात्र सामान्यांच्या हृदयात

मलीन कपड्याचा सल्यूट घेत फडकतोय

 

कशाचा स्वातंत्र्य दीन

आणि कशाच आलंय स्वातंत्र्य

इंग्रज निघून गेले कायमचे पण

दिडशहाने हलवत आहेत देशाचं सूत्र


स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

हे सांगत फिरतात काही जण

शासक प्रशासक म्हणजे आहेत नोकर

हे सुद्धा जाणून घ्यावं प्रत्येक जण


म्हणून मित्रांनो आपणही देशाला लुबाडूया

पण त्याआधी थोडीशी गुंतवणूक करूया

निसर्ग संवर्धनासाठी झाडे लावूया,

गरजा मर्यादीत ठेवूया,

दुसऱ्याला आपल्या जगण्यातील रुबाब दाखवणे टाळूया

गरजेएवढेच प्रत्येक गोष्ट मिळवत राहूया,

प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळेल यासाठी प्रयत्न करुया

देश ओस पडूद्या आपल्याला त्याच काय देणं-घेणं

जे सोबत आहेत त्याच्यासाठी मात्र आपण नेहमी पुढं येऊया.


देशाचं वाटोळं होऊद्या

आपल्याला काय देणं घेणं

आपण मात्र आपल्या परिसराला

उत्तम आणि पोषक असे बनवूया

आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे

त्या गोष्टींची निर्मिती आपणच करुया


देशावर आक्रमणे झाली तर होऊद्या

आपल काय जातंय त्यात

आपण फक्त आपल्या शेजाऱ्यांसोबत

परिसरातल्यांसोबत एकात्मतेने राहूया


जात धर्म पंथ यामुळं देशात होत राहूद्या वाद विवाद

आपण फक्त हिंदू, मुस्लिम, बौध्द, शीख, इसाई, ख्रिश्चन

अशा वेग वेगळ्या जाती धर्माचे एकत्रित शेजारी शेजारी राहूया

रोटीच नात एक मेकांशी ठेवून आनंदाने इथ जगूया


बेटीच्या व्यवहाराच बघुया नंतर कधीतरी

आधी रोटीच्या व्यवहाराच नक्की करून घेऊया

मग काय घेणं देणं देशाचं आम्हाला या

आम्ही सुखाने नांदू लागल्यानंतर

जात धर्माच्या नावावर लढणाऱ्याना लढत राहू द्या....


स्वातंत्र्याचा महिना संपत असताना 

आम्ही स्वातंत्र्य आहोत का हे बघुया

नसल आम्हाला स्वातंत्र्य तर सर्वजण मिळून

एकत्रितपणे स्वातंत्र्य जगत राहूया....

मानसाशी मानसासारखे वागुया..........


© जी.संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

Monday, August 14, 2023

तुमचा आमचा स्वातंत्र्य दीन ?



स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना या, स्वातंत्र्याच्या समता,स्वातंत्र्य आणि बंधुता हा गुण आपल्यात असावा. हे गुण जर आमच्यात रुजनार नसतील तर, स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. जर ते गुण प्रत्येक भारतीयांच्या अंगी भिनतील तर, आम्हाला कोणाकडूनही संरक्षण करून घेण्याची गरज नाही. 

     वास्तव पाहिले तर असे निदर्शनास येते की, आमच्यामध्ये स्वातंत्र्याची बीजे रुजण्यास खूप कालावधी लागेल असे दिसते कारण, एक-मेकांबद्दल जर समतेची भावना नाही, आप-आपसात बंधुता नाही असे असेल तर, आजसुद्धा स्वतःच्या संरक्षणासाठी बहिणीला भावाकडे राखी बांधून संरक्षणाची अप्रत्यक्ष मागणी करावी लागेल जर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात ही स्थिती असेल तर कसे चालेल ?

       आज च्या युगात आम्हा सर्वांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. मग या पोलीस प्रशासनाला भारतीय नागरिक (फक्त स्त्री नाही) राखी का बांधत नाही ? मला व्यवस्थेच्या कोणत्याही गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात स्वारस्य नाही.पण मनात आलेला प्रश्न उपस्थित करणं आणि व्यवस्थेच्या शिलेदारांना त्याचा जाब विचारणं हा स्वातंत्र्याचा भाग आहे.

         पण आपल्या मताच्या विरोधात किंवा आपल्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्याला विचाराच्या आधारे प्रत्युत्तर न देता. त्याचं व्यक्त होन बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशा स्वातंत्र्याला आम्ही कस स्वीकारायचं ? तुमच्या या अशा दुतोंडी स्वातंत्र्याचा धिक्कार करतो. लाथ मारतो तुमच्या अशा स्वातंत्र्य सोहळ्याला...सोहळा साजरा करण्याने कोणी स्वातंत्र्य होत नसते. इंग्रजांनी आपल्यावरील सत्ता सोडली म्हणून काय झालं ? जिथं एखाद्याला गुलामीत ठेऊन राजा बनण्याची ज्यांची विचारसरणी आहे. अशांसोबत हा स्वातंत्र्याचा सोहळा कितीही पिढ्यांनी साजरा केला तरी, या स्वातंत्र्य दिनाचा काहीही फायदा होणार नाही. हे का लक्षात येत नाही.स्वातंत्र्य हे कायद्याने नाही तर प्रत्येकाच्या मनाने उपभोगता व देता आलं पाहिजे. तेव्हा कुठं या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होतो...मग त्या स्वातंत्र्यात कोणत्याही बहिणीला कोणाकडून संरक्षणासाठी आपल्या भावाला राखी बांधायची गरज पडणार नाही. राखी बांधून घ्यावी लागते म्हणजे संरक्षणाची मागणी आली. संरक्षण आले म्हणजे कोणी एक दुबळा झाला. दुबळेपन आले म्हणजेच समता नाकारण्याची सुरुवात झाली. जिथे स्वातंत्र्य नसते तिथे तुम्हाला काय खाक स्वातंत्र्य मिळेल. मग जिथे स्वातंत्र्य नाही तिथे स्वातंत्र्य दिन कसाही साजरा केला तर काय फरक पडतो. कोणतेही सोहळे साजरे केल्याने आमचा विकास होणार नाही. आमच्या विकासासाठी विचारातील सम्यक परिवर्तन आणि मी एक माणूस म्हणून माणसाशी कसे वागावे या भावनेने राहिलो तर आम्हाला काहिही अडचणी येणार नाहीत.

         तिकडे ज्या गुरुजीला आदर्श मानता तो गुरुजी राष्ट्रध्वज अमान्य करतो, मी राष्ट्रगीत सुद्धा म्हणणार नाही, राष्ट्रध्वज फडकविणार नाही असे जाहीर पने सांगतो, त्याचेच शिष्य तुम्ही सत्तेत असताना राष्ट्रध्वज प्रत्येकाच्या घरावर सन्मानाने फडकवण्याचा आदेश देता. एवढीच देशभक्ती रुजवायची आहे तर मग त्या तुमच्या गुरुजींच्या डोक्यात जरा घुसवा ना. मग सामान्य नागरिकांच्या मनाचा विचार करा.

         तसंही सामान्य नागरिकांच्या देशप्रेमाबद्दल बोलण्याची तुमची लायकीच नाही. देशातील प्रत्येक क्षेत्रात अयोग्य गोष्टी घडवून आणून देशाचं वाटोळं करण्यात गुंग असणारे तुम्ही, तुमची काय लायकी आहे सामान्य नागरिकांच्या मनात देशभक्ती रुजवण्याची. एक किस्सा सर्वपरिचित आहे तो असा की, गांधिजीकडे एक महिला आपल्या मुलाला असलेली गूळ खाण्याची सवय सोडवण्यासाठी आल्यानंतर गांधीजींची वागणूक आणि दिलेला सल्ला. साधं व्यसन सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला त्याच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी आधी स्वतः निर्व्यसनी बनले. मग तुम्हाला नागरिकांच्या मनात देशभक्ती रुजवयचीच आहे तर मग आधी स्वतः मध्ये देशभक्ती रुजली आहे का हे कधी पाहाल ?

          धर्म आणि जातीच्या नावावर तंटे निर्माण करणारे तुम्ही, शासकीय कामात गैरव्यवहार करून मलिदा जमा करणारे तुम्ही, तुमच्या त्याच चुकीच्या कामामुळे शेकडो आणि हजारो जीव गेले तरी तुम्हाला फरक नाही पडत मग तुम्हाला नागरिकांच्या मनात देशभक्ती रुजविण्याचा काय अधिकार ?

          अशा या सर्व चुकीच्या वागणुकीला फाटा देण्यासाठी प्रतीके पुढे करून देशभक्तीच ढोंग रचल्याने देश सर्वांगीण विकसित होणार नाही. मी जे करत आहे ते योग्य आहे. अधीच्यानी काहीच केलं नाही असा डांगोरा पिटून स्वतः किती चांगले आहोत हे सिद्ध करण्याचा सगळा आटापिटा का आणि कशासाठी ?

         प्रतिकांतील देशभक्ती पुढे येत असताना त्या प्रतीकांचा होत असलेला गैरवापर याबद्दल कोणीही काहीही चकार शब्द काढायला तयार नसतील तर त्या देशभक्तीचा हा तमाशा किती दिवस करणार ?

         मनात द्वेषभावना ठेवून, जीवित संपत्तीचा विचार न करता प्रतिकांद्वारे देशप्रेम दाखवून, आपण देशाचा कोणता विकास करू शकतो का ? याचा विचार व्हावा त्या विचारातून आजच्या दिवसाची सुरुवात करूयात व एकमेकांशी प्रेमाने वागून आपलं आयुष्य सुखकर व आनंदी बनवूयात. आपल्या सर्वांना या बंदीस्त स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐💐💐💐💐💐💐💐

@ जी.संदीप

9552803980

Friday, August 11, 2023

ती आणि तो....





 ती:- चल रे आपण देवाला जाऊयात

मी :- का बर तिकडे काय आहे ?

ती :- आहे काही तरी नाही सांगणारं तुला.

मी :- पण तरी काय गरज आहे तिकडे जायचो ?

ती :- देव आहे तो, त्याच्याकडे आपल्याला जावंच लागते ना ?

मी :- का ? नाही गेलं तर जमणार नाही का ?

ती :- नाही जमत, ते आहेत म्हणून तर आपण आहोत. 

मी :- ते कस ? आपण तर आपल्या आई वडिलांमुळे आहोत ना ? 

ती :- आपल्याला फक्त जन्म त्यांनी दिला पण देव नसते तर आपण जन्म घेऊ शकलो नसतो.

मी :- जन्म घेण्यासाठी देवाची गरज असेल तर मग आई वडिलांचं काय काम आहे. देवाने डायरेक्ट आपल्याला जन्म द्यायला पाहिजे ना.

ती :- बाकी काही बोलू नकोस, तुझ्या तोंडी लागण माझ्याने शक्य नाही. तू येणार आहेस का नाही तेवढं सांग ?

मी :- मी एकदा बोललेल तुला कळत नाही का ? तू हजार वेळा जरी विचारलीस तरी मी माझं मत बदलणार नाही.

ती :- येणार आहेस का नाही ?

मी :- नाही.

ती :- यामुळच तू सिंगल आहेस रे. तू मुलींच्या मनाची कदरच करत नाहीस.

मी :- यात मी काय चुकीचं बोललो बर, मला पटत नाही मी येत नाही.

ती :- तुला पटत नसल तरी काही वेळा मुलींच्या विचारांची कदर कर रे.

मी :- ज्या मुलींना माझे विचार पटत नाहीत त्या मुलींनी माझ्याशी संपर्क करूच नये ना. मी काय औतन देत नाही, किंवा मी स्वतः कधी मॅसेज करून म्हणत नाही मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून.

ती :-

बाय ! बोलू नकोस मला. देवाला येणार असशील तरच कर मॅसेज

मी :-  काल्पनिक गोष्टी सोडून वास्तवाकडे जायचं असेल तरच बोल मला. नाहीतर कायमचा

बाय ! तर बाय !

ती :- सुधर रे जरा, किती म्हणून attitude रे तुझ्यात ?

मी :- काही चुकीचं बोललो का ? काही गैर बोललो का ? काही खोटं बोललो का ? माझी चूक तरी काय आहे ?

ती :- तू माझी कधीच स्तुती करत नाहीस, तू माझ्या आवडीच्या काही गोष्टी कधी कधी मुद्दाम करत नाहीस,  तू माझ्या विचारांना स्वीकारत नाहीस. तू तुला हवं तेच करतोस.

मी :- मला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. बर झाल तू स्वतः हुन बाय म्हटलीस, मी जर तुझ्यापासून दूर झालो असतो तर माझ्या मनाला खूप पश्र्चाताप झाला असता. मी स्वतः ला माफ करू शकलो नसतो. तू बोललेल्या कोणत्याच आरोपावर मला काहीही बोलायचं नाही.

ती :- म्हणजे मी केलेले आरोप तुला मान्य आहेत ?

मी :- त्या प्रश्नाचं पण उत्तर देणं पण गरजेचं आहे असं वाटतं नाही. वेळ आल्यानंतर तुला माझ्याबद्दल कळेल. तोंडावर तुझी स्तुती करणारे योग्य का  मनातून काळजी करत तुला जपणारा योग्य ? 

*Thnx sorry ani bye*

Thursday, August 3, 2023

ती होईल सेट्टल तुला काय भेटल ?




आयुष्याच्या एका वळणावर,

एकटेपणा घालवायला तुझ्या आयुष्यात ती येईल

आनंदाने जायला लागतील दिवस तुझे 

वेळ आणि काळ सुद्धा लक्षात नाही राहील.


दिवसा गणीक दिवस जात राहतील,

महिने आणि कदाचित वर्ष सुद्धा निघून जातील,

आयुष्याची स्वप्ने रंगवत

दिवस रात्र निघून जात राहतील


दोघांच्याही मनामध्ये स्वप्नांची रीघ लागेल

परिस्थिती नुसार आणाभाका घेतल्या जातील.

तिच्यासाठी हवं तिथे हवा तसा बदल तू करत जाशील,

काहीच नसेल बाकी बदलण्यासारखे तर विनाकारण वाद घातला जाईल.


तू आता पहिल्यासारखा राहिला नाहीस रे, अस म्हणून 

वारंवार तू बदलल्याची जाणीव करून दिली जाईल.

तिच्यासाठीच तू बदलत गेलास पावलोपावली

पण तरीही त्या बदलण्याची तिला कदर नाही राहील.


तुझ्याकडून तिला हवी तशी साथ नाही मिळाली,

तर तुला दोष देणे तिचे सुरू होईल.

तुझ्यापासून नेहमीचे दूर होण्यासाठी

 विविध मार्गाचा विचार करणे डोक्यात सुरू राहील


दूर होण्यासाठीचे मार्ग शोधत असताना 

विविध मार्गांमध्ये एखादा मार्ग  अंमलात आणल्या जाईल

त्याची अंमलबजावणी करण्याआधी तशीच स्वप्ने पुन्हा रंगवणारा

अजून दुसरा कोणीतरी शोधला जाईल.


त्याच्यासोबत पुन्हा तीच स्वप्न त्याच गोष्टी

पुन्हा नव्याने रंगवल्या जातील.

तो तिच्यात गुंतत जाईल, ती त्याच्यात गुंतत जाईल

हे नवीन नाते सुद्धा  किती दिवस टीकेल हे फक्त तीच्याच मनात राहील. 


टिकले ते नाते तर कुटुंब किंवा अन्य कारणे देऊन

दूर होण्याची वेळ येऊन जाईल.

या सगळ्या गोष्टीत तिला तिचे कुटुंबीय

इज्जतीचा प्रश्नापायी चांगला मुलगा शोधून

तिच्या भविष्याची करतील सोय 


त्या परिस्थितीत ती स्वतः ला सामावून घेऊन

आनंदाने मार्गक्रमण करत जाईल.

तू तिच्या जुन्या आठवणीत रमून व्यसनाधीन होशील,

त्या व्यसनाधिनतेत स्वतःच भविष्य उध्वस्त करून टाकशील.


घरच्यांनी जो जोडीदार निवडला आहे

त्याच्यासोबत ती राहील आनंदाने

तुझ्या आधी आणि नंतर सोडले कैक तिने,

मग तिला फरक पडणार नाही कोणाच्याही विरहाने.


त्यामुळं मित्रा प्रेमाच्या फंदात पडण्याचा विचार

डोक्यात येण्याआधी स्वतःला भविष्यासाठी पात्र बनव.

येण्याचा प्रयत्न जरी केली कोणी आयुष्यात,

तिच्यासोबत भविष्याचा लेखी करार करण्याची हिम्मत ठेव.


भावनिक होऊन तू तिच्या प्रेमात वाहवत जाशील तर

तुला तुझ भविष्य घडवण्या वेळ मिळेल का ?

तीच भविष्य कस घडवायचं हे ठरवायला तिचा बाप आहे

पण तुझ्या भविष्याची डोर तुझ्याशिवाय दुसर कोणी नाही हे तुला कळेल का ?

- संदीप गोणारकर 

9552803980

Thursday, July 20, 2023

900 रुपये आणायचे कुठून ?

 काही वर्षापासून राज्यात वातावरण एक अराजक तयार आहे. कोणाची पाहणी आहे याची शाश्वती कोणाला येत नाही. व्यक्ती किती विश्वासू आहे याची खात्री कोणी घेत नाही. सात राहण्याचं व्यवहारा काही वचनं जोडून जन्माला येतात. काही वर्षातील निवडणूक आयोगते प्रत्येक तरुण निक्षेमध्ये जात आहे. जो काँग्रेसी देश कल्याणकारी गुण पाहण्यासाठी तोच कामी स्वतःचा फायदा होईल हे पाहण्यात गुंत आहे. 

सर्व नागरिक हा त्यांचा मुख्य विषय नाही तर स्वतःची एक विचारधारा हे त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय बनत आहे का ? हा प्रश्न आज तरुणाईला प्रश्न आहे ? ही तीच तरुणाई आहे जीने भ्रष्टाचाचाच्या अण्णा हजारे यांना उत्तर दिले. त्याच अण्णा हजारे स्वयंसेवक एक सहकारी स्वयंची लोकशाही पार्टी लोकशाहीत उतरतो आणि स्वतः एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्याच आंदोलनात हजारे स्वाभिमानी सहकारी असलेली हिसभारत केंद्रीय सत्ता राज्याचा राज्याचा सोपवला राज्यपाल कार्यपालन. 

          हे सर्व घडेल आणि का घडेल ? हा एक मोठा प्रश्न आहे ? आणि असे प्रश्न निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तरुण मित्रानो तुम्ही कोणाचे गुलाम नाहीत. भलेहीत पक्षाचे तुम्ही समर्थक असाल म्हनुन काय ? तुम्ही त्यांच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करत आहात काय ? स्वतंत्रपणे समर्थन करणे ठीक आहे. पण त्याबद्दल त्यांच्याबद्दल आपली बाजू मांडली गेली आहे. राजकीय राजकीय स्वतंत्रता आले म्हणजे तुमचा काही पक्ष आहे ? ते वेगळेत आहेत, म्हणजे ते देशाच्या शेवटच्या नागरिकांच हिताचे काम केले पाहिजे पण तसे नाही.

तरुणांनो, तुम्ही स्वतः अनुभव आहे मित्राय, देश निर्माण किती आणि शिक्षण बाहेर पडणारे विद्यार्थी किती आहेत ? विद्यार्थी जास्त आणि वाढ कमी असताना तुम्ही तुमचा आवाज का दाबून ठेवता ?

       काल काहि दिवस विविध मुद्द्य लिहीत होतो. अशात जरा लिखित बंद केल. बंद केल म्हणजे त्याला काही कारणे आहेत. पण या स्थितीत मित्रांचे मेसेज किंवा कॉल काही आणि सांगतात तुझ मत काय ? कारण तू व्यक्त होत नाहीस ? त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर मला समर्थ नाही. सध्या विचाराने खूप स्वस्थ आहे. शांतता काय सुरू आहे समजत नाही. हे सुद्धा कळला मार्ग नाही. 

         जे तरुण मित्र मला शीर्षक पाठवून म्हणतात की या विषयावर लिहिले आहे. तेव्हा मला प्रश्न पडतो की, तर लिहायला हवेच पण हे लिहिलेले तुमच्या हृदयात हृदयते का ? मनाने तर मग आपल्या हकसाठी कधी आपण पाहू आहोत ? कोणत्याही राजकीय व्यक्तीचे सदस्य न घेता आपण स्वतःसाठी लिहणार आहोत का ? देशात रोज लाखो लोक जन्म घेतात. ते मरत असताना जगलेत गेलं सुद्धा त्यांना माहीत नसतं. मग असे मरण काय कामाचे ?

          हे सर्व कथन करण्यामागे एक अनोखी ऊर्जा आहे मित्रांनो. मी आता हे सर्व टाइप करतो. बाहेर मस्त पाऊस सुरू आहे. घर शांत बसून गरमागरम स्वच्छता मूवी किंवा काही रोमँटिक वाचण्याचं निर्माण हे सर्व काही लिहिण्याचं समोर आले आहे. याला कारण म्हणजे “900 रुपये द्यक्खूनही एक लेख लिहा.” हा आला एक मॅसेज हा एक मॅसेज मला मनातून हादरवून गेला मित्रांनो. मी विद्यार्थी दशेत असताना फॉर्म भरण्यासाठी 400-500 रुपये लागतील ते पैसे जोडण्यासाठी घराच्या कसं मागव असा प्रश्न पडतो. एवढ काय तर मागच्या वर्षी पीएचडी फॉरची पेट परीक्षा फॉर्म भरण्यासाठी युनिव्हर्सिटी लावा 1200 रुपये फिस भरण्यासाठी भाजपने पैसे भरले. तेव्हा खूप मोठे नुकसान झालेले ज्ञान असूनही आता भोगले आहे. ही नुकसान अजून वर्ष भोगावी हे किती निवडेल. पैसे किंवा चित्रे हा मुद्दा नाही. तर हवेवर हवे तेव्हा पैसे न मिळणे यातून काय स्थिती होती याची खात्री आहे. त्याचा मित्राचा एक मॅसे आला आणि पूर्ण भूतकाळ बाकीचे मन उद्विग्न झाले.

खरच 900 रुपये द्यक्ष कुठून ? ग्रामीण ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ स्थिती नवीन तो शांतपणे सर्व जग वेळ घालवतो. या जोडत तो स्वतःला सांगतो आहे, मी आराम करण्यासाठी आलो आहे. उठेल वाट्टेल ते वेळ पडलीच तर उपशी पण आई-बाबांच्या कष्टाची चीज करेल. या विचाराने आपण विचारतो. पूर्णपणे उच्चभ्रूत सामील न होता त्यांच्यापासून दूर ठेवतो. पुस्तक आणि फक्त पुस्तक एवढातच त्याची दुनिया ही आहे तो जाणतो आणि कामाला मानसिकता तयार करून बघतो. पूर्ण लक्ष्य अभ्यास करत असतो. या अभ्यासात तो कमी पडतोय का हे स्वतःला विचारत असते. पूर्णपणे कमी पडतोय स्वतःला पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहतो. या संघर्षमय जीवनाचा शेवट आणि शेवट होणार हे त्याला माहीत नाही. तो सर्व सहन करत जगत असतो. 

याच्या संघर्षाची परीक्षा संपवून त्याचा संघर्ष संपला, ते अभ्यासाच आयुध म्हणून वापरून आपला संघर्ष संपवून तो सज्ज असतो. यामाईत तो स्वतःला तयार असताना काही परीक्षांना सामोरे जात. परीक्षा देत असताना स्वतःला तो टिकेल का नाही ? असा प्रश्न मनाला करत असतो.

          पुढील नवीन आले तरुण अभ्यासात गुंतवून घेतले जेव्हा लक्ष्याच्या एखाद्या विभागाच्या जाहिराती तेव्हा तो हवालदिल होतो. इकडे, तरुणाने सुद्धा अभ्यासाची मशागत असते. ती मशगतीच पीक काय हे पाहण्यासाठी एक पायरी त्याची चिंता असते. घराशी स्वतःच बोलणेल असते. मला घरची स्थिती सांगतात, ते ऐकून मुलगा स्वतःला देतो. बाबा घाबरू नका माझा अभ्यास सुरू आहे. तुमची अशी कष्ट जास्त दिवस वेळ नाही. तुम्ही जास्त टेंशन घ्या. मी दलाला बाबा. तुम्हाला सुद्धा आनंदी असतात. त्याला परिस्थितीची जाच आहे ते अभ्यास करून व्यायामाला आणि आपण दारिद्र्य संपवेल. अशी आशा वाटत असते.

       त्याची स्थिती मुलगा विकत असतो. कधी जागा निघते कधी जाहिराती याची अपेक्षा असते आणि ऐकन पेरण संवाद साथ देत असतो. तो आनंदी होतो आता तुमचा स्वप्न पूर्ण होणार आहे. आपण परीक्षा उत्तीर्ण हात कर्मचारी लागू करा आणि घरची गरीबी आपण करू शकत नाही. जाहिराती जाणून घेण्यासाठी ते मोबाइलमध्ये जाहिरात पाहू. जाहिराती पाहत असताना कोणत्या उमेदवाराला किती जागा आहेत याचा मागोवा तो घेत असतो. जागता माचा तो शुल्कगोवा तो स्वत:साठी आवश्यक असताना या सूचनेच्या ठिकाणी. शुल्क शुल्कच त्याच भान जागेवर. स्वप्नाच्या दुनियेतून तो बाहेर पडतो. त्यांना दलाल बोलतांना आठवते. क्षणभर त्याला सुचत नाही. सुन बातम्या मोबाईलवर जाहिराती बंद करतो आणि विचारात गढून.    

         पुढे काय होते हे स्वतःच अनुभवत आहात मित्रांनो.

 ऐन पेरण भर तलाठी भरती आली आणि परीक्षा शुल्काचा आकडा कोणत्याही भाग पैसे आणण्यासाठी कुठून आणि हा फॉर्म भर कसा ? हा प्रश्न तुम्हा हजारो विद्यार्थ्याला आहे.

 तरीसुद्धा आपण शांत आहात मित्रांनो, वर्ग शुल्क हवेच प्लॅन्ससाठी ?

            गुजराती महागाईचा विचार करताना महागाईभत्ता नावाने साधारांपेन 6% दिला. तुलना परीक्षा फीआकारण्या त्याची संरचना. तुलना करता येत नाही. कारण परीक्षा फिस हे नाममात्र आकारणे बंधन असते. भक्तीभीला संपूर्णपणे बसवल्यास त्या गुणाचे गांर्य लक्षात नाही यावं आणि आपल्याला पालक जात याची नोंद घ्यावी. पण फिस आकाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जात आहेत. असे निदर्शनास येत आहे. परीक्षा फी आकारून या खाजगी संस्था आपला गल्ला भरत आहेत काय ? हा प्रश्न निर्माण होत आहे. नोकरभरती रुग्णांना नोकरीचे पैसे स्वत: चा गल्ला भरून आहेत ? हा प्रश्न या प्रश्न उपस्थित होत आहे. महागाई भत्त्याचा विचार करता 2019 साला निघालेली तलाठी भरती 500 रुपये आकारली गेली होती. त्याच पोर्टलसाठी आता ऑनलाइन परीक्षा असताना दुप्पट फिस आकारली जाते. अशी कोणती किंमत आहे जी बेकार तरूण सरकार पैसे वसूल करून तिजोरी वेळ येत आहे. परीक्षा शुल्क दर्जा विचारात घेता अव्वलची युपीएससी ही संस्था आपली नियुक्ती मात्र शुल्क आकारते. एमपीएससी सुद्धा एवढी फिस आकारत नाही. मग अशा खाजगी संस्थांकडून एवढी फिस का आकारली जात आहे ? ही परीक्षा किती करोड करोड रुपये हे टेंडर देण्यात आले आहे ? ज्यामुळ शासन या फिस आकरणी नंतर गिलावली गप्प आहे. मग अशा खाजगी संस्थांकडून एवढी फिस का आकारली जात आहे ? ही परीक्षा किती करोड करोड रुपये हे टेंडर देण्यात आले आहे ? ज्यामुळ शासन या फिस आकरणी नंतर गिलावली गप्प आहे. मग अशा खाजगी संस्थांकडून एवढी फिस का आकारली जात आहे ? ही परीक्षा किती करोड करोड रुपये हे टेंडर देण्यात आले आहे ? ज्यामुळ शासन या फिस आकरणी नंतर गिलावली गप्प आहे.

          फक्त प्रशासकीय विभागातील भरतीसाठी साधारणपणे 500 रूपयाच्या वैयक्तिक फिस आकारली जाते. आयबीपीएस नावाची संस्था चालू वर्षापासन परीक्षा घेत असते. त्या सुरक्षा मार्गाने सुद्धा एवढी फिस आकारली जात नाही ? मग ही मनमानी का आणि पद्धतीसाठी ?

मित्रांनो ही मनमानी रोखठोक असेल तर एमपीसीसाठी आंदोलन तसेच पुन्हा एकदा व्हावे. पण या आंदोलनाचे नेतृत्व राजराण्‍यांच्‍या सामन्‍याने नाही तर सामान्य तर्‍हेच्‍या राजकारणाचा अधिकार आहे. समान्य आंदोलन राजकीय व्यक्ती काय आले याचा पुरावा अख्ख्या महाराष्ट्राने दोन जोडून पहिले आहे. एक एमपीएसी आंदोलन आणि समजल्या जाणाऱ्या लालपरी संपूर्ण बसच आंदोलन. ही पोलीसी मढयाच्या प्रमुख लोकी खाणारे आहेत.

         बुलढाणा खुर्ची बस चालवली असताना स्थानिक स्वराज्य संस्थाचालकांच्या पायघड्यांवरून खुर्चीवर बसून आनंद व्यक्त करत होते. पूर्वीच ठरले होते. फक्त दुःखद घटना घडत असताना ते सोपस्कार पण न ढळता नियोज घडते घडते पार पाडले. काही दुःखद घडले तर सुतक घडला कार्यक्रम ढकलण्याची हिंदू संस्कृती आहे ना ? मग प्रांत बसत नागरिक घडतात? सातारा तेव्हा तुमची हिंदू संस्कृती ? 

     अशा निर्लज्ज लोकाना त्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज असताना पार्टीचे समर्थक समजून तुम्ही त्या नेत्याच्या कार्याचा गौरव करता, त्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहता, पण तेच राजकारणी आता  तुमच्यासाठी पुढे येत आहेत का ? विद्यार्थ्यांना एवढी फिस का आकारली जात आहे याबद्दल चकार शब्द तरी काढत आहेत का ? मग अशा राजकारण्यांवर कोणी टीका केली त्यांच्या निर्णयाचा कोणी विरोध केला तर तुमच्या अंगात वीज का संचारते ?  याचा विचार करा मित्रांनो.    

           देशातील विविध संस्था परीक्षा शुल्क ही फायदा देणारे साधन म्हणून पाहत नाही तर, मग राज्यातील  शासनच या खाजगी संस्थांच्या मनमानी कारभाराकडे का डोळेझाक करत आहे ? बेरोजगार तरूणांकडून परीक्षा शुल्क आकारात असताना एक फॉरमॅलिटी म्हणून फिस न आकरता त्याला व्यावसायिक रूप देऊन नफा कामावण्याचा विचार केला जातो आणि आपण सर्वजण गुलाम होऊन ते स्वीकारत असतो. तलाठी भरतीतील अर्ज केलेल्या उमेदवारांचा आकडा पाहता तो साधारणपणे 11 लाख 50 हजार 265 असा आहे. या प्रत्येक विद्यार्थ्यांना 900 रुपये या दराने फिस आकारण्यात आलेली आहे याचा विचार करता 103,52,38,500 एवढी रक्कम झालेली आहे. म्हणजेच 103 कोटी रुपये निधी या निमित्ताने जमा झालेला आहे. जमा झालेल्या निधितील उर्वरित निधीच काय केलं जातं याबद्दल कोणत्याही विद्यार्थ्यांना सोयरसुतक नाही. शासनाला सुद्धा या विद्यार्थ्यांच्या स्थितीच काही देणं घेणं नाही. त्यांना हवा आहे पैसा तो हवा तसा घेतील काढून. आपल काय जात यात, आपण आपल मोकळं होऊ  900 रुपये देऊन.

Friday, July 7, 2023

Convacation फॉर्म (डिग्री फॉर्म) कसा भरावा.

 

विविध प्रश्नांसाठी ही उपयुक्त माहिती...

तो ऑफलाइन भरावा का ?
फॉर्म कसा भरावा ?
कागदपत्रे काय लागतील ?
प्रमाणपत्र ऑनलाइन भेटेल का ऑफलाइन ?
या विविध प्रश्नांसाठी स्लाईड सह माहिती देत ​​आहे...

पदवीप्रमानपत्रासाठी विद्यापीठाने पुरविलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन फॉर्म भरावा. 
प्रमाणपत्र ही विद्यापीठात, महाविद्यालयात किंवा पोस्टाद्वारे तुम्हाला प्राप्त करून घेता येईल. 



ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठीची पद्धत खालीलप्रमाणे....



डिग्री फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या srtmun.ac.in या लिंकद्वारे  होम पेजवरील परीक्षा विभागावर क्लिक करावे. त्यानंतर परीक्षा दीक्षांत कक्ष (Convacation Section) या पर्यायावर क्लिक करावे. 



दीक्षांत कक्षावर क्लिक केल्यानंतर येणाऱ्या पहिल्या पर्यायावर क्लिक करावे.


त्यानंतर फॉर्म भरण्यासाठीची खालील लिंक दिसेल त्यावर क्लिक करावे.   

त्यानंतर स्क्रीन वर create New Account असा पर्याय स्क्रीन वर दिसेल त्यावर क्लिक करावे.





रजिस्ट्रेशन साठी माहिती मागणारे पेज स्क्रीन वर दिसेल त्यात 
01) तुमचा ई-मेल टाइप करावा (हाच नंतर तुमचा आयडी म्हणून वापरण्यात येतो. )
02) पासवर्ड टाइप करावा (हा नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी असतो. त्यामुळ मला पासवर्ड माहीत नाही कोणता आहे की, आस समजून गोंधळून जावू नये. तुम्हाला हवा असलेला पासवर्ड तुम्ही टाइप करू शकता.)
03) शेवटच्या सेमिस्टर वरील (सहावे सेमिस्टर) सीट नंबर टाकावा 
त्यानंतर सबमीट करावे. 
आशा पद्धतीने पदवी प्रमानपत्रासाठीचे तुमचे रजिस्ट्रेशन होईल.


त्यानंतर लॉगिन चा पर्याय स्क्रीन वर दिसेल. त्यात रजिस्ट्रेशन करतेवळी टाकलेला ई मेल आणि तुम्ही टाइप केलेला पासवर्ड टाइप करून लॉगिन वर क्लिक करावे. 



लॉगिन केल्यानंतर स्क्रीन वर तुमचा शेवटच्या सेमिस्टर चा सीट नंबर दिसेल. स्क्रीन वर खालच्या बाजूने edit चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून पुढील माहिती भरावी लागेल.





convacation form चा पर्याय निवडत असताना तीन पर्याय येतील 
01) Convacation 26 th (हा पर्याय निवडलात तर तुम्हाला विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्र स्वीकारता येईल. यासाठी 510 रुपये फिस आकरण्यात आली आहे. )
02) Preseintia (महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या पदवीदान समारंभात तुम्हाला पदवी स्वीकारता येईल.यासाठी 180 रुपये फिस आकरण्यात आली आहे.)
03) Absentia (पोस्ट द्वारे पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी, या पर्यायासाठी पोस्ट टपाल खर्चाचा अतिरिक्त चार्ज लागेल. यासाठी विद्यापीठात जाऊन फिस भरावी लागेल.)



इतर सर्व माहिती भ्रूण घ्यावी त्यात 
01) उत्तीर्ण झालेला कोर्स 
02) उत्तीर्ण झालेले वर्ष 
03) ग्रेड
04) रिझल्ट 
05) शेवटच्या सेमिस्टर चा बैठक क्रमांक.
06) महाविद्यालयाचे नाव (कॉलेज कोड ) 
07) ईलीजीबीटी नंबर (हा तुमच्या मार्कमेमो वर असतो)
08)मोबाइल नंबर 
09) ई-मेल आय डी 
10) पूर्ण नाव (मार्क मेमो वर जसे आहे तसेच)
11) (optional च्या ठिकाणी Optional विषयची नोंद करावी.
12) पूर्ण पत्ता (पोस्टाने हवे असल्यास अचूक पत्ता टाकावा)
त्यानंतर save या पर्यायावर क्लिक करावे.  



त्यानंतर photo या पर्यायावर क्लिक करून फोटो आपलोड करावा.(फोटो आपलोड करत असताना फोटोचे background पांढऱ्या कलरचे असेल याची खबरदारी घ्यावी. तोच फोटो Degree Certificate वर प्रिंट होऊन येत असतो.) 





फोटो निवडून save या पर्यायावर क्लिक करावे. 
अपलोड केलेली फोटो स्क्रीनवर दिसत असेल तर home या पर्यायावर क्लिक करावे.
त्यानंतर स्क्रीन वर प्रिंट या पर्यायावर क्लिक करून प्रिंट काढून योग्य त्या फिस सह सर्व वर्षाचे मार्कमेमो झेरॉक्स, ऑनलाईन अपलोड केलेली पासपोर्ट फोटो सह फॉर्म महाविद्यालयात किंवा विद्यापीठात जमा करावा.





धन्यवाद. 

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...